news24today

Latest News in Hindi

रेती चोरीवर पत्रकाराचा दणका, शिवालय कंपनीवर 360400 रुपयांचा दंड !

1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 11 ऑक्टोबर 2021 – तालुक्यात व अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरील अरूणनगर , मोरगाव अर्जुनी, नवेगावबांध ते कोहमारा या राज्यमार्गाचे काम सन २०१८ पासून रोडाचे रूंदीकरणाचे काम सुरू असून या रोडाचे काम शिवालय कंन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत करण्यात येत आहे.

या रोडावर मोठ्या प्रमाणात गावालगत सिमेंट रस्ते व रोडाचे दोन्ही बाजूला रोडालगत नाल्यांचे बांधकाम सुरू असून या कामासाठी नवेगावबांध येथे शिवालय कंन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत मिक्सर प्लांट सन २०१९ पासून आहे आणि आजही रोडाचे काम सुरू आहे.

या कामावर मोठ्या प्रमाणात रेतीचा वापर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, गोंदिया व भंडारा जिल्ह्यात सन २०१८ पासून रेती घाटाचे लिलाव झाले नसतांनी सुद्धा रेतीचा वापर सुरू आहे. सदर अवैध मार्गाने वाहतूक होणारी रेती पालांदूर ,दिघोरी, बोंडगावदेवी , नवेगावबांध यामार्गाने दररोज रात्रीला १५ ते २० टिप्परच्या साहाय्याने वाहतूक होत असतांनीसुद्धा अवैध रेती वाहतूक करणाऱ्या टिप्परकडे कोणतेही अधिकारी ढूकूंन सुद्धा पाहत नव्हते.

सदर शिवालय कंन्स्ट्रक्शन कंपनीच्या मिक्सर प्लांटवर अवैध रित्या येणारी रेती शासकीय यंत्रणेनेच्या आशिर्वादानेच आणल्या जात होती. महसूल विभाग व पोलीस विभाग नवेगावबांध चौरस्त्यावर मागिल दोन वर्षांपासून कोविड-१९ कोरोना महामारीत लाॅकडाऊन मध्ये रात्रंदिवस गस्ती करत असतांनी सुद्धा रात्रभर टिप्पर चालत असतांनी कधीच टिप्पर अडवून तपासणी केली नाही.

काही दलालांच्या सहमतीने रेती येत असल्याचे काही रेती पुरवठा करणारे कंत्राटदार सांगत होते. सदर अवैध रेती प्रकरणाबाबत भामा बबनलाल चु-हे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दि.७/२/२०२१ ला लेखी तक्रार केली व मोक्यावरील फोटो दिली असता अर्जुनी मोरगाव चे तहसीलदार यांनी मोका चौकशी केली. चौकशी अहवालामध्ये मौजा परसोडी रयत ते नवेगावबांध रोडचे बांधकाम शिवालय कंन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत पेटी काॅन्ट्रक्ट विजउम इंटरप्राईजेस यांने नवेगावबांध येथील मालकीचे गट नंबर ९९-२८/१ प्लाटमध्ये २४ ब्रास रेती पकडण्यात आली.

कंपनीचे मॅनेजर जयदेव यांनी सांगितले की, सदर रेती नामें सतीश आगासे दिघोरी/मोठी ता. लाखांदूर जि.भंडारा तसेच नामें दिनेश खोब्रागडे अर्जुनी मोरगाव या लोकांनी रेती पुरवठा दि.६/२/२०२१ केले असल्याचे सांगितले. मोका चौकशीमध्ये तलाढी एस.एच.चचाने तसेच मंडळ अधिकारी नवेगावबांध यांनी पंचनामा करून तहसीलदार अर्जुनी मोरगाव, जिल्हाधिकारी यांचे कार्यालयीन पत्र क्र.ख.ली./खनिज/कावि/७०७/२०/१६ दि. ११/११/२०१६ अन्वये तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग ४ व दि. १२ जानेवारी २०१८ अन्वये कलम ४८(८) मधील तरतुदीनुसार अवैध उत्खनन वाहतूक या पोटी दंड आकारणी करण्यात आली.

यामध्ये एकुण दंड २४ ब्रास रेती वर ३६०४०० रुपये दंड गैरअर्जदार शिवालय कंन्स्ट्रक्शन कंपनी मार्फत अतुल सुधाकर डोलीकर लाखनी जि. भंडारा यांनी दि. १७/३/२०२१ ला भरले. यामुळे अवैधरित्या रेती वाहतूक करून रोडाचे काम करणाऱ्या कंपनीचे धाबे दणाणले आहेत. आणि अवैध रेती वर वचक बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *