पक्ष हा कार्यकर्ता मुळेच मोठा होतो ,त्याला जपले पाहिजे – माजी मंत्री राजकुमार बडोले.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 10 ऑक्टोबर 2021 – भारतीय जनता पार्टी विधान सभा छेत्र अर्जुनी मोरगाव बूथ अध्यक्ष , शक्ती केंद्र प्रमुख पदाधिकारी संमेलन आज दिनांक – 10 ऑक्टोबर 2021 रोजी आशीर्वाद लॉन तहसील कार्यालय समोर संपन्न झाले, यावेळी माजी मंत्री राजकुमार बडोले उपस्थित होते त्याच बरोबर विदर्भ संघटन महामंत्री उपेंद्र कोठेकर,भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे, माजी आमदार संजय पुराम, माजी आमदार हेमंत पटले, खोमेश रहांगडाले माजी आमदार, केशव मानकर जिल्हा अध्यक्ष, रचना ताई गहाने प्रदेश सदष्य, वीरेंद्र अंजनकर संपर्क प्रमुख, जिल्हा महामंत्री संजय कुलकर्णी ,लायकराम भेंडारकर, तालुका अध्यक्ष अशोक लँजे, अरविंद शिवणकर, साहेबराव कटरे व मोठ्या संख्येत कार्यकर्ते उपस्थित होते, सर्वप्रथम महापुरुषांच्या तेल चित्राचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, मंचावर पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री बडोले मंचावरून बोलताना म्हणाले की, कार्यकर्त्यांनी हेवे दावे करून चालणार नाही तर संघटनात्मक काम करून आपल्या पक्षाच बूथ मजबूत करून येणाऱ्या निवडणुकीत उमेदवारांना निवडून आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, हेवे दावे बाजूला सारून कामे केली तर येत्या निवडणुकीत आपला पक्षाचा विजय नक्की होईल, यावेळी मंचावरून खासदार सुनील मेंढे यांनी सुद्धा आपले विचार वेक्त केले ते म्हणाले भाजप पक्षाने संपूर्ण जगात भारताचा नाव उंचावला आहे, पंतप्रधान मोदी यांनी विविध प्रकारच्या यौजना राबवून देशातील जनतेचा फायदा केला आहे, संपूर्ण देशातील शेतकऱ्यांना प्रति वर्षाला 6000 रुपये दिले जातात रक्कम जरी लहान असली तरी संपूर्ण शेतकऱ्यांना याचा फायदा होत आहे, त्याच बरोबर हेमंत पटले माजी आमदार यांनी देखील आपले मत वेक्त केले, त्यांनी येत्या निवडणुकीत जिंकण्यासाठी प्रत्येकांनी आपले बूथ मजूर करावे असे आवाहन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शिशिर येळे यांनी मानले, येत्या निवडणुकीत भाजप पंचायत समिती आणि जिल्हा परिषद च्या निवडणुकीत घवघवीत विजय मिळविणार असे मत माजी मंत्री राजकुमार बडोले आणि भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे यांनी वेक्त केले.