म्हसवानी ; सरपंच आहे झोपेत, गावातील नागरिकांना दुसऱ्यांचा घरी जाऊन भरावे लागते पिण्याचे पाणी…
1 min read

गोंदिया,म्हसवानी,07 ऑक्टोंबर 2021- सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम म्हसवानी येथे वर्षभर राहते पिण्याच्या पाण्याची समस्या तेथील बोअरवेल किव्वा इतर पाण्याच्या साधनांमध्ये सुद्धा पिण्यायोग्य पाण्याची सोय नाही, तेथील नागरिक सांगतात , गावातील लोकांना ज्यांच्या घरी घरघुती बोअरवेल आहे त्यांच्या कडे जाऊन पाणी भरावे लागते, व पाणी भरण्यासाठी खूप वेळ रांगेत उभे राहावे लागते असे त्यांचे आरोप आहे . ग्रामपंचायतला विचारता तेथील अधिकारी हे उडवाउडवी चे उत्तर देतात निवेदन देऊन सुद्धा पाण्याची समस्या समाप्त झालेली नाही अशे तेथील गावकरी सांगतात.
• 5 महिन्या पूर्वी जेव्हा पत्रकार संघाचे सदस्य यांनी म्हसवानी ग्राम ला भेट दिली होती तेव्हा ग्रामपंचायत येथे सतत 2 दिवस सरपंचा मॅडम ग्रामपंचायत ला हजर नव्हती . तेथील गावकऱ्यांना विचारता ते सांगतात मॅडम चे पतीच ग्रामपंचायत मधला कारभार सांभाळतात, त्यांच्या पती यांना पाण्याच्या समस्या बाबत विचारता ते उद्या होऊन जाईल परवा होऊन जाईल असे उडवा उडवी चे उत्तर मिळाले.
