आ.मनोहर चंद्रिकापुरे : व्यक्तिमत्त्व विकास कार्यशाळेचा समारोप.
1 min readशब्दसंस्कार आयुष्य घडविते..
गोंदिया,अर्जुनी मोरगाव,06 ऑक्टोबर 2021-
बाल मनावर एकदा कोरलेले संस्कार व त्यातून निर्माण होणारे भविष्य हे आयुष्य घडविते. राष्ट्रसंताच्या विचारांचे बीज ग्रामविकासात रुजवावेत. विद्यार्थ्यांनी खूप शिकून प्रशासकीय अधिकारी होण्यासाठी कार्यशाळेचा उपयोग करावा असे विचार आ मनोहर चंद्रिकापुरे यांनी सोमवारी कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केले.
शब्द संस्कार अकॅडमी अकोलाचे संचालक प्रा प्रशांत ठाकरे महाराज यांनी भाषण व व्यक्तिमत्व विकास यावर सात दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती येथे केले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आ मनोहर चंद्रिकापुरे होते.यावेळी प्रशिक्षक प्रशांत ठाकरे, मंजू चंद्रिकापुरे ,श्रद्धा ठाकरे, सहा पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, मुख्य प्रशासक लोकपाल गहाणे, उद्धव मेहंदळे, कुलदीप लांजेवार, गजानन डोंगरवार , विश्वास कुरवाडे, विजय राठोड, दुर्योधन मैंद उपस्थित होते.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपल्या क्षेत्रात स्थानिकांचे प्रेमापोटी येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. यातील आचार विचार व वाचन संस्कृती आपल्या अंगी रुजवून कायम अंगीकारावी .स्थानिक सरपंच, शिक्षक, वकील व इतर विद्यार्थ्यांनी भविष्यात उपयोग करून इतरांवर ठसा उमटवावा. स्वतःचे व गावाचे भविष्य उज्वल करावे.
विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत भाषण व व्यक्तिमत्त्वविकासातून यशोशिखर गाठावे असा आशावाद प्रशांत ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम गजानन डोंगरवार यांनी विचार व्यक्त केले. कार्यशाळेचे विद्यार्थी ऍड तुळशीकर,दिया डोये, कांचन पाऊलझगडे, पौर्णिमा शिवणकर, स्नेहल तावडे, कुणाल बोरकर, संजीवनी खोटेले, राजश्री खोटेले यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सावरटोला, ब्राह्मणटोला येथील विद्यार्थी पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजेंद्र चव्हाण यांनी केले. स्वेता पाऊलझगडे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता दुर्योधन मैंद, कृष्णकांत खोटेले, हिरालाल घोरमोडे,कृ उ बा समितीचे सचिव संजय सिंगनजुडे ,मंगेश डोये, धम्मदीप मेश्राम , दुलाराम मेश्राम, केवळराम सोनवणे, कलिदास सोनवणे व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.