अखेर मिल्ट्री जवान उमेश कोहळे यांना मारहाण केल्या प्रकरणी 9 आरोपींवर गुन्हा नोंद…
गोंदिया,पांढरी,०५ ऑक्टोबर २०२१ – पोस्टे डुग्गीपार हद्दीत गैरकायदयाची मंडळी गोळा करून मारपीट करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे, प्रकरण अशा प्रकारे आहे की, दिनांक ०४ ऑक्टोबर ला ०२ वाजता दरम्यान मौजा पांढरी येथे यातील फिर्यादी नामे उमेश श्रीराम कोहळे वय ३५ वर्ष रा. पाढरी, ता.सडक अर्जुनी हा मित्तल राईस मिल समोरील रोडावरील चिंचेच्या झाडाखाली आपल्या चार चाकी वाहन क्रमांक एम.एच. ३५ ए.जे./ ३००८ उभी करून वाहनाचे जवळ उभा असतांना यातिल आरोपी क. ०१ ते ०६ व ईतर ०३ हमाल हे फिर्यादी सोबत सकाळी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून गैरकायदयाची मंडळी गोळा करून फिर्यादी जवळ येवुन.
शिविगाळ करून फिर्यादीला जबरजस्तीने मिलमध्ये नेवुन शिवीगाळ करून लाथाबुक्याने मारपिट करून तसेच
मिलचे खोलीत नेवुन प्लास्टीक पाईप ने पाठीवर मानेवर अंगावर मारून तसेच धर्माकाल चे बाटल ने उजवे डोळयाचे भुवईचे वर मारून जखमी करून पुढे जिवाने मारण्या पीटण्याची धमकी दिल्याने फिर्यादिचे रीपोर्ट वरून पोस्टे डुग्गीपार येथे अप क. १६३/२०२१ कलम १४३,१४७,१४९, ३२६,३४२ ,५०४ ,५०६ भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्हयाचा तपास पोनि वांगडे पोस्टे डुग्गीपार, हे करीत आहेत.