शिवसेना महिला आघाडीच्या बैठकीत अनेक महिलांचा शिवसेनेत प्रवेश
1 min read
गोंदिया,देवरी,02 ऑक्टोबर 2021- देवरी, भंडारा व गोंदिया जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख माननीय निलेश धुमाळ व जिल्हा प्रमुख माननीय सुरेंद्र नायडू यांचे मार्गदर्शनात आणि भंडारा व गोंदिया जिल्हा संपर्क संघटक सौ. शीतलताई मंढारी यांचे सूचनेनुसार शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटक सौ. करुणा कुर्वे यांचे अध्यक्षतेखाली पुराडा येथे आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीत आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीच्या संदर्भात चर्चा करण्यात आली. महाराष्ट्राच्या टोकावर असणाऱ्या गोंदिया जिल्ह्यात शिवसेनेला घराघरात पोहचविण्यासाठी विचारमंथन करण्यात आले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीवर भगवा फडकविणसाठी शिवसेना महिला आघाडी बळकट करणे आवश्यक असल्याचे मत जिल्हा संघटिका करुणा कुर्वे यांनी बैठकीत व्यक्त केले.
यावेळी शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी जिल्हा संघटक करुणा कुर्वे, तालुका संघटिका प्रिती उईके, तालुका उपसंघटिका सलमा पठाण, कविता मेहर, देवरी प्रभाग संघटिका सरिता हाडगे प्रामुख्याने उपस्थित होते. आढावा बैठकीचे आयोजन तालुका उपसंघटिका सलमा पठाण यांनी केले होते.