प्राण्यांची अवैध वाहतूक करणाऱ्याला नवेगावबांध पोलिसांनी केली अटक..
1 min readगोंदिया,नवेगावबांध,02 ऑक्टोबर 2021- दिनांक 01/10/2021 चे 11 वाजता दरम्यान मौजा टी पॉइंट नवेगावबांध येथे यातील आरोपीने स्वतःच्या ताब्यात असलेली टाटा कंपनीच्या ट्रक च्या डाल्यामधे एकूण 28 गाय,बैल व गोरे यांचे चारही पाय रस्सिने घट्ट बांधून , ओरडू नये म्हणून रस्सिने तोंड बांधून गर्दी करून कोंबले असल्याचे दिसले व त्यांच्या चारा पाण्याची व्यवस्था न करता निर्दय तेने वागणूक करताना मिळून आल्याने फिर्यादी पोहवा/902 इंद्रपाल कोडापे यांच्या लेखी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन नवेगाव बांध येथे अप क्र. 120/2021 , प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून समोर च तपास पोलिस स्टेशन नवेगाव हे करीत आहे.
तसेच , सध्या प्राण्यांची वाहतूक करून त्यांना कत्तलखाने कपण्या साठी वाहतूक करणे हा अवैध व्यवसाय गोंदिया जिल्ह्यात खूप वाडला आहे , तसेच अधिकारी सुद्धा संधी पाहून आपले हाथ शेकत आहेत, जिथे तिथे भ्रष्टाचार पसरलेला आहे.