स/अर्जुनी येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्त्यांनी चुरडी हत्याकांड प्रकरणी तहसीलदारांना दिले निवेदन.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,27 सप्टेंबर 2021- सडक अर्जुनी येथील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्त्यांनी चुरडी येथील हत्याकांड प्रकरणी सडक अर्जुनी येथील मा. तहसीलदारांना मार्फत मा. मुख्यमंत्र्यांना 27 सप्टेंबर 2021 रोजी निवेदन दिले.
ता. तिरोडा, ग्राम चुरडी येथे 21 सप्टेंबर 2021 रोजी एकाच कुटुंबातील 4 व्यक्तिचे हत्या झालेली आहे , प्रकरण हे अगदी मन हेलावणारे असून सदर गावातील बिसेन या दांपत्याची आणि पौर्णिमा व तेजस या दोन मुलाची हत्या की आत्महत्या ,हे कळण्यास मार्ग नाही . परंतु निर्दयी स्वरूपाचे ठरलेले हे प्रकरण माणुसकीला काळीमा फासणारे आहे . रेवचंद बीसेन यांच्या परिवारात घडलेल्या या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंतेचे वातावरण पसरलेले आहे. या प्रकरणातून जिल्ह्यात गुनेगारी प्रवृत्ती वाढत चालली असून त्यावर नियंत्रण करणे अती आवश्यक आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सी. बी. आय चौकशी करण्यात यावी व गुन्हेगारांना योग्य ती शिक्षा करण्यात यावी. अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली. अन्यथा न्याय मिळेपर्यंत आंदोलन वंचित बहुजन आघाडी च्या वतीने करण्यात येईल. अशी माहीत निवेदनात दिली. असून
वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते ,भारद्वाज शेंडे,सुनील भिमटे,ताराचंद बनसोड,संदीप शेंडे, प्रमोद बडोले,प्रशांत भेंडारकर, अनिल बनसोड,पृथ्वीराज बाबोळे, फलींद्र रहांगडाले,नाशिक मेश्राम,बबन बोरकर, निवेदन देताना उपस्थित होते.