धर्मांतरासाठी नाशिकच्या युवकाच्या खात्यात २० कोटी!

उत्तरप्रदेशात गाजत असलेल्या धर्मातरणाच्या प्रकरणात तेथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) रविवारी लखनऊमध्ये ३ जणांना अटक केली आहे.
नाशिक,वृत्तसेवा, : उत्तरप्रदेशात गाजत असलेल्या धर्मांतरनाच्या प्रकरणात तेथील दहशतवाद प्रतिबंधक विभागाने (एटीएस) रविवारी लखनऊमध्ये ३ जणांना अटक केली आहे. त्यापैकी एक जण नाशिकचा आहे. धर्मांतरणासाठी नाशिकच्या युवकाच्या खात्यात विविध देशांतून २० कोटी रुपये जमा झाले.
या युवकाच्या खात्यात जमा झालेले रक्कम समजल्यावर अनेकांचे डोळे विस्फारले. एटीएसच्या पथकाने अटक केलेल्या तिघांमध्ये नाशिकचा कुणाल अशोक चौधरी उर्फ आतिफ, मुजफ्फरनगर (उत्तर प्रदेश) येथील मोहम्मद शरीफ कुरैशी व मोहम्मद इदरीस यांचा समावेश आहे. दरम्यान, संशयित कुणालच्या अटकेबाबत नाशिकचे पोलीस मात्र अनभिज्ञ असून, उत्तरप्रदेशात ही कारवाई झालेली असल्याने, स्थानिक यंत्रणा सतर्क झाली आहे. उत्तर प्रदेश एटीएसने या तिघांकडून कुवैतसह अन्य काही देशांतून धर्मांतरणासाठी २० कोटी रुपये जमविल्याचा, तसेच उत्तर प्रदेशात जूनमध्ये उघड झालेल्या बेकायदेशीर धर्मांतराचे देशव्यापी रॅकेट आणि धर्मांतर करण्यासाठी परदेशातून निधी संकलनाच्या रॅकेटमध्ये सहभागाचा आरोप आहे.
या प्रकरणात एटीएसने जूनमध्ये मौलाना उमर गौतमला, तसेच मेरठ येथून नुकतेच मौलाना कलीम सिद्दीकीला अटक केली होती. सलीमने सिद्दीकीला १७ वर्षे धार्मिक धर्मांतर करण्यात मदत केली. त्याचप्रमाणे इद्रिस आणि चौधरी यांनीदेखील सिद्दीकीला मदत केली आहे. अटक केलेले तिघे मौलाना कलीम सिद्दीकीचे साथीदार असून, सिद्दिकी ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, एटीएसने आतापर्यंत देशाच्या विविध भागातून १० ते १२ जणांना अटक केली आहे. वेगवेगळ्या नावाने चालवले जाणाऱ्या विश्वस्थ संस्था (ट्रस्ट)मध्ये धर्मांतरासाठी परदेशी निधी वापरला जात होता, असे उत्तर प्रदेश एटीएसच्या तपासात पुढे येत आहे.
- नाशिक कनेक्शन..
आतिफ उर्फ कुणाल नावाच्या व्यक्तीला नाशिक रोडच्या आनंदनगर भागातून अटक करण्यात आली आहे. तो शहरात कुणाल नावाने राहायचा. विदेशातून वेगवेगळ्या खात्यांमधून २० कोटी रुपये अतिफ उर्फ कुणालच्या खात्यात कुठून आले, याचा तपशील शोधण्यात येत असून, त्याची चौकशी सुरू असल्याचे बोलले जाते.अशी वृत्त सरकारनामा ने प्रकाशित केली आहे.