विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या गोरेगाव ची वार्षिक सर्वसाधारण सभा रद्द करण्याबाबत तहसीलदारांना पत्र.
1 min readगोंदिया,गोरेगाव,(विशेष प्रतिनिधी),26 सप्टेंबर 2021: तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सह संस्था गोरेगाव र.नं.८१ ची वार्षिक सर्वसाधारण सभा महाराष्ट्र सहकारी संख्या अधिनियम १९६० व महाराष्ट्र सरकारी संख्या अधिनियम १९६१ मधील तरतुदीचे आहधनतेने दिनांक २६/०९/२०२१ रोज रवीवारला संस्थाच्या कार्यालयात आयोजीत करण्यात आली होती. परंतु संस्थेचे संचालक श्रीमान हिरालाल रामाजी रहांगडाले आणि इतर ०९ सभासदांनी वार्षिक सर्व साधारण सभेला विरोध करून कोवड १९ चे उल्लंघन होत आहे अशी तक्रार तहसील कार्यालय गोरेगाव आणि पोलिस स्टेशन गोरेगाव ला तक्रार दिली. त्याअनुसंघाने संबधीत विभागाकडुन कारवाई सूचना नोटीस देण्यात आली. तक्रार कर्ते श्री हिरालाल रामाजी रहंगडाले संस्थेचे संचालक दिनांक १२/०८/२०२१ ला मासिक सभेमध्ये वउपस्थित होते. सभेमध्ये वार्षिक साधारण सभा बोलविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. परंतु तक्रार कर्त्यांनी हेतुपुरस्सर खोटी माहिती देवून अडथडा निर्माण केला आहे. कोविड-१९ चे पालन करुनच सभेचे आयोजन केले होते. संस्थेमध्ये सभासदांना बसण्याकरिता पुरेशी जागा उपलब्ध आहे. तक्रार कर्त्यांनी सरकार अधिनियमाचा उलंघन करून संस्थेकडे किंवा ना सहाय्यक निबंधक सहकारी संस्था तालुका गोरेगावला तक्रार देणे गरजेचे होते, परंतु तालुका प्रशासन आणि पो स्टे. गोरेगांव यांना तक्रार देवून प्रशाशकीय कामामध्ये अडथड़ा निर्माण केला. त्याकरिता संस्थेचे वतीने आम्ही दिलगीरी व्यक्त करित आहो असे सहकारी संस्था ने पत्रात म्हटले आहे.
याकरिता सभा रद्द करण्यात आली.