शासनदरबारी पोलीस पाटील पत्नी, गावात मात्र पतीदेवच बनतात पोलीस पाटील.
1 min read
गोंदिया,तिरोडा,(विशेष प्रतिनिधी),24 सप्टेंबर 2021-
आमगाव तालुक्यातील तिगाव येथील रहिवासी नरेश सुरेश बोपचे यांनी मु. देऊटोला पो. म्हसगाव येथील पोलीस पाटील यांच्या संदर्भात मा. उपविभागीय अधिकारी तिरोडा जि. गोंदिया यांचेकडे तक्रार दाखल केली आहे.
त्यांच्या तक्रारीनुसार देऊटोला येथे पोलीस पाटील म्हणून प्रतिभाताई विजय मानकर यांची शासनदरबारी नोंद आहे. पण आपल्या मृत जावयाचे गावातच मरण पावले असल्या चे ग्रामसेवक यांनी सागल्या प्रमाणे प्रमाण पत्र मागण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस पाटील यांना भेटू दिले नाही. तसेच प्रतिभाताई पाटील यांचे पती हे स्वतःच मीच पोलिस पाटील आहे असे सांगून तक्रारदारास भेटले. पोलिस पाटील या नात्यानेच त्यांनी ग्राम पंचायत सचिव यांच्याशीसुद्धा फोनवर चर्चा केली आणि मी असा दाखला देत नाही असे सांगितले. गावकरी व सरपंच उपसरपंचांकडूनही असे समजले की पतीच पोलीस पाटील चे सर्व काम करतात.
म्हणून बेजबाबदार पोलीस पाटील व नकली पोलिस पाटील यांच्यावर योग्य ती कारवाही व्हावी अशी तक्रारकर्त्याची मागणी आहे.व सद्या ह्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.