News24 Today

Latest News in Hindi

स/अर्जुनी पंचायत समिती स्तरावरील शासनाच्या सर्व विभागांच्या कामांचा मा. आमदार चंद्रिकापुरे यांनी पंचायत समिती सभागृहात आढावा घेतला.

1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,23 सप्टेंबर 2021- सडक/अर्जुनी पंचायत समिती स्तरावरील शासनाच्या सर्व विभागांच्या कामांचा मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पंचायत समिती सभागृहात दिनांक २३/०९/२१ आढावा घेतला.

सर्व ग्रामपंचायतींनी सरासरी रुपये १ कोटी खर्चाचा गाव आराखडा तयार करण्याबाबत मा. आमदार यांनी दिनांक २१ मे २०२१ चे पत्राद्वारे सर्व सरपंच/ग्रामसेवक यांना सूचित केले होते. त्यानुसार रोहयो अंतर्गत अनुज्ञेय असलेले एकूण २६० कामे विचारात घेऊन अभिसरण करून ६०:४० या प्रमाणात कुशल व अकुशल कामे बसवून गाव विकास आराखडा तयार करणे अपेक्षित आहे. मात्र त्यानुसार गाव आराखडा तयार करण्यात आले नाहीत. सबब विशेष मोहीम घेऊन दिनांक ३ आक्टोंबर २०२१ पूर्वी गाव आराखडा तयार करून तहसीलदार सडक/अर्जुनी यांच्याकडे सादर करण्याबाबत ग्रामसेवकांना सूचना दिल्या, सोबतच गाव आराखडे कसे तयार करावे याचे मार्गदर्शनही केले.

रोहयो अंतर्गत सर्व प्रकारची २६० कामे अनुज्ञेय असून त्याद्वारे गावांच्या विकास साधणे सहज शक्य आहे त्यासाठी पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, तालुका रोहयो समन्वय अधिकारी, व ग्रामसेवक यांच्यामध्ये समन्वय ठेवण्याबाबत व यात कोणतीही अडचण येत असल्यास प्रत्येक संपर्क साधूनेबाबत सूचना केल्या.
गावा आराखडा तयार करतांना योजना चे अभिसरणाचे माध्यमातून गावातील सर्व प्रकारचे रस्ते, नाल्या, गोठे, तलावाचे खोलीकरण, शाळांच्या वर्गखोल्या बांधकाम, अंगणवाडी बांधकाम, ग्रामपंचायत भवन बांधकाम, आदी सर्व मूलभूत सुविधा येत्या दोन वर्षात रोहयोच्या माध्यमातून पूर्ण करता येतील असा विश्वास आमदार मोहदय यांनी व्यक्त केला.


रोहयो कामाशिवाय प्रधानमंत्री आवास योजनेची प्रलंबित ९००, घरकुल रमाई घरकुल योजनेची ७१ कामे व शबरी घरकुलाची १८ कामे तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना घरकुल अभियंत्यांना दिल्या. जे लाभार्थी घरकुलाचे काम मागील तीन वर्षापासून सुरुच करत नाही त्यांना घरकुलाची गरज नाही असे गृहीत धरून तसा अहवाल सादर करण्याबाबत सूचना केली, याशिवाय भटक्या व विभुक्त जातीसाठी नव्याने सुरू केलेली यशवंत घरकुल योजनेच्या कामांना त्वरित मंजुरी देवून काम सुरू करणेबाबतही सूचना केली. याशिवाय अनुसूचित जाती/ नवबौद्ध घटकांसाठी बांधकामे, दुधाळ जनावरांचा, शेळी गटांचा विविध घटकांचना पुरवठा, ग्रामीण पाणीपुरवठा योजना, आरोग्य योजना, कोव्हीड 19 चे उपाय योजनांचे आढावा घेण्यात आला. स्वच्छ भारत मिशन कामाचे आढावा संदर्भात तालुक्यातील सर्व कुटुंबाकडे वयक्तिक शौचालय उपलब्ध झाल्यामुळे तालुका उघड्यावर शौचास जाण्याचे क्रुप्रथे पासून मुक्त झाला असल्याचे गट विकास अधिकारी श्री. खुणे यांनी सांगितले.
सदर आढावा बैठकीस श्री खुणे गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे अधिकारी, व ग्रामसेवक हजर होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *