आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अर्जुनी/मोर येथील जनसंपर्क कार्यालया च्या समोरील सरपंच सेवा संघाचे ठिय्या आंदोलन मागे.
1 min read
गोंदिया,अर्जुनी मोरगाव,23 सप्टेंबर 2021- सरपंच सेवा संघाचे ठिय्या आंदोलन मागे
ज्या ग्रामपंचायतीनी मागील अनेक वर्षापासून सार्वजनिक
पथदिव्याचे बिल न भरल्यामुळे व फार मोठ्या प्रमाणावर थकबाकी वाढल्यामुळे महावितरण कंपनीने वीजपुरवठा बंद केला आहे, व थकीत देयके भरल्यानंतरच वीजपुरवठा सुरू करून देण्याबाबतची भूमिका घेतली. याविरोधात सरपंच सेवा संघ अर्जुनी मोरगाव तालुक्याचे पदाधिकाऱ्यांनी मा.आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचे अर्जुनी/मोरगाव येथील जनसंपर्क कार्यालयात च्या समोर दि.२३/०९/२१ रोजी ठिय्या आंदोलन सुरू केले होते.

या आंदोलकांची मा.आमदार यांनी भेट घेऊन व महावितरणचे देवरी क्षेत्राचे कार्यकारी अभियंता श्री. फुलझले, अधीक्षक अभियंता श्री. वाघमारे, व मुख्य अभियंता श्री. वासनिक यांचेशी संपर्क साधून सध्याचे पावसाचे दिवस, त्यातच जंगली जानवर यांच्या गावात शिरकाव विचारात घेऊन सध्या वीज जोडणी करून देणेबाबत विनंती केली. महावितरणचे अधिकाऱ्यांनी तात्पुरती जोडणी करून देण्यास होकार दिला. त्यानंतर संघटनेने ठिय्या आंदोलन मागे घेतले.