ओबीसींच्या विविध मागण्या संदर्भात सडक अर्जुनी तालुका राष्ट्रीय ओबीसी युवामहासंघाचे तहसीलदारांना निवेदन.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,अश्लेष माडे (विशेष प्रतनिधी),22 सप्टेंबर 2021-
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने 22 सप्टेंबर 2021 रोजी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच दिवशी धरणे व आंदोलन करून निवेदन देण्यात आले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष श्री बबनराव तायवाडे, डॉक्टर खुशालचंद्र बोपचे,सचिनजी राजूरकर, डॉक्टर अशोक जिवतोडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मा.तहसीलदार सडक अर्जुनी यांना निवेदन देण्यात आले.
यामध्ये महाराष्ट्रातील पाच जिल्हा परिषद व त्या अंतर्गत पंचायत समिती पोटनिवडणुका आगामी काळात होत असून होऊ घातलेल्या जनगणनेमध्ये ओबीसी संवर्गाची जातिनिहाय जनगणना करण्यात यावी. तसेच भारतीय संविधानाच्या कलम 243(डी -6) आणि कलम 243(टी -6) सुधारणा(अमेडमेंट ) करून ओबीसी संवर्गात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, महानगरपालिका,नगर परिषद, नगरपंचायत मध्ये ओबीसी संवर्गाला 27% आरक्षण राहील अशी तरतूद करण्यात यावी. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली आरक्षणाची 50% मर्यादा रद्द करण्याची घटनेत तरतूद किंवा सुधारणा करावी. व संपूर्ण देशातील ओबीसींना न्याय मिळवून द्यावा. अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी बुधवार ला माननीय तहसीलदार सडक अर्जुनी यांना सादर करण्यात आले.
याप्रसंगी माननीय अशोकजी लंजे, मधुसूदनजी दोनोडे, किशोर भाऊ शेंडे, रोशन शिवणकर, अश्लेष माडे, उज्वल चौधरी, वेद परसोडकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.