सोनू सूद वरील कारवाई विरोधात ‘आप’ मैदानात.
अभिनेता सोनू सूद याच्यावर सध्या कर चोरी प्रकरणी आयकर विभागाने कारवाई सुरू केली आहे. पण ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने सुरू असल्याचा आरोप आम आदमी पार्टीने केला आहे .तसंच या कारवाईविरोधात आम आदमी पार्टी रस्त्यावर देखील उतरली आहे. सोनू सूदवरील कारवाईचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये निदर्शने केली. कोरोना काळात सामान्यांना सोनू सूदने खूप मदत केली. पण आता सरकार त्यांना त्रास देत आहे, असा आरोप आप ने केला आहे. अशे वृत्त मॅक्स महाराष्ट्र ने प्रकाशित केले.