News24 Today

Latest News in Hindi

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा सडक अर्जुनीच्या वतीने सेवा व समर्पण सप्ताहांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

1 min read

गोंदिया, सडक अर्जुनी, 17 सप्टेंबर 2021-पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चा सडक अर्जुनीच्या वतीने सेवा व समर्पण सप्ताहांतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या अनुषंगाने प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभधारक लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.तसेच रक्तदान करणा-याचे सत्कार करण्यात आले.

सेवा व समर्पण सप्ताहांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमात सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी यावेळी केले.

यावेळी केक कापुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला,काशीनाथ कापसे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा अर्जुनी-मोरच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

याप्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष केशवराव मानकर,प्रदेश उपाध्यक्ष हेमंत पटले,जिल्‍हा संघटन महामंत्री बाळाभाऊ अंजनकर,माजी आमदार संजय पुराम,जिल्हा महामंत्री लायकराम भेंडारकर,तालुकाध्यक्ष अशोक लंजे,लक्ष्मीकांत धानगाये,शेषराव गि-हिपुजे,गिरधारी हत्तीमारे,राजेश कठाणे,शिशिर येळे,राजेश कापगते,चेतन वळगाये,ललित मानकर,गौरेश बावनकर,विलास बागळकर,पद्मा परतेकी,कविता रंगारी,शिला भेंडारकर,रुपाली टेंभुर्णे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थिती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *