सडक अर्जुनी येते शिवसेनेतर्फे शिवभोजन केंद्राचे उद्घाटन.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी , अश्लेश माडे(विशेष प्रतनिधी)-कोरोनाविषाणू च्या संसर्गामुळे तसेच लॉकडाऊन मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत राज्यातील गोरगरीब, कामगार,शेतकरी, मजूर,विद्यार्थी,उपाशी राहू नये.तसेच गरिबांच्या उपासमारीची शक्यता लक्षात घेऊन सडक-अर्जुनी शहरात दिनांक 12 सप्टेंबरला शिवसेना भंडारा – गोंदिया जिल्हा संपर्कप्रमुख श्री.निलेशजी धुमाळ यांच्या हस्ते शिवभोजन थाळी केंद्राचे शुभारंभ करण्यात आले.
त्यामुळे आता शिवभोजन थाळी च्या भुकेल्या व गरजू नागरिकांना शहरात लाभ घेता येणार आहे. या उद्घाटन प्रसंगी निलेशजी धुमाळ यांच्यासोबत नवनियुक्त सहसंपर्कप्रमुख मुकेशजी शिवहरे, जिल्हाप्रमुख सुरेंद्र जी नायडू, नवनियुक्त जिल्हा समन्वयक सुनीलजी लांजेवार, विधानसभा संपर्कप्रमुख बाबा ठाकूर, राजू भाऊ पटले जिल्हा संघटक, तालुकाप्रमुख मनोज भाऊ रामटेके, युवा सेना उपजिल्हा अधिकारी महेश जी डुंभरे, शिवसेना शहर प्रमुख महेंद्र वंजारी, युवा सेना तालुका अधिकारी सचिन फुंडे, अश्लेष माडे तालुका प्रसिद्धी प्रमुख, शंकर मेश्राम,दिग्रस टेंभुर्णे,विलास पटेल,लाला निकुळे,महादेव शिवणकर, सेलू राजांनी, भरत भाऊ कुरसंगे, तसेच इतर तालुका शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.