आमदार चंद्रिकापुरे यांच्या हस्ते म्हसगांव येथील सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन संपन्न
दिनांक 11/09/21 शनिवार रोजी मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या शुभ हस्ते गोरेगाव तालुक्यातील म्हसगांव, येथे किसनराव बारेवार ते बलीराम बोपचे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता व स्मशानभूमी कडे जाणारा रस्त्याचे खडीकरण २५१५, स्थानिक आमदार विकास निधी, या निधीतून करण्यात येणाऱ्या कामाचे भूमिपूजन आज पार पडले.
यावेळी विशाल शेंडे गोंदिया जिल्हा महासचिव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, सोमेश रहांगडाले अध्यक्ष सरपंच सेवा संघ तालुका गोरेगाव, बाबा बिसेन, लालचंद चौहान, गजानन परशुरामकर,बाबा बहेकार, बाबा बोपचे, चौकलाल येडे ,सुरेंद्र रहांगडले, तीलकचंद चव्हाण सरपंच, चंद्रशेखर बोपचे उपसरपंच, सुनील चौधरी, सोनाली बोपचे सदस्य, सुनील इडपाचे, देवराम बर्डे,कुवरलाल पटले, श्रावण बडोले,युवराज राऊत, दीपक टेभूर्णीकर, जितेंद्र बावनकर नागोराव इडपाचे,बबलू नेवारे, देवराम राऊत,आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.