चिचटोला येथे अवैध दारूबंदी साठी बचत गटाच्या महिलांचा एल्गार..
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी,11 सप्टेंबर 2021, अस्लेष माडे(विशेष प्रतिनिधी):सडक /अर्जुनी तालुक्यातील यशवंत ग्राम चिचटोला येथे सन २००३पासून संपूर्ण गावात दारूबंदी होती.मात्र कोविड-१९ लाॅकडाऊन मध्ये कोरोना काळात चिचटोला येथे मागिल वर्षीपासून सिरेश कुरुमदास बांबोळे यांनी गावात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला.८ ते १० महिन्यापासून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोमात सुरू असून गावात अवैध धंद्यांना ऊत आला आहे.गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद व्हावी यासाठी उन्नती ग्राम संघ चिचटोला व सर्व बचत गटाच्या महिलांनी ५ सप्टेंबर रोजी अवैध दारू विक्रेता सिरेश कुरुमदास बांबोळे यांचे घरावर मोर्चा नेऊन दारूबंदी साठी एल्गार पुकारला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छता अभियानात राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार तसेच निर्मल ग्राम व हागणदारीमुक्त गाव असे अनेक पुरस्कार यशवंत ग्राम चिचटोला या गावाला मिळाले आहेत.गावात सन२००३ पासून दारूबंदी असून मागिल ८ते १० महिन्यापासून अवैध दारू विक्री जोमाने सुरू आहे.गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्याचा मुद्दा उचलून गावातील दारूबंदी साठी सर्व बचत गटाच्या महिलांनी पुढाकार घेऊन पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे ४ सप्टेंबर ला दारूबंदीची तक्रार दिली.तसेच ग्रामपंचायत चिचटोला व तंटामुक्ती समितीला सुद्धा तक्रार केली. गावात एकुण १६ बचत गट असुन सर्व बचत गट उमेद अभियानाला जोडले आहेत.सन २००३ पासून २०२०पर्यंत दारू विक्री बंद होती.पण कोविड -१९ कोरोना काळात लाॅकडाऊनमध्ये गावातील सिरेश कुरुमदास बांबोळे यांनी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला.यामुळे गावातील शांतता भंग होऊन अवैध धंद्यात वाढ झाली.गावातील सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी उन्नती ग्राम संघ चिचटोला व सर्व बचत गटाच्या महिलांनी एल्गार पुकारून दारू विक्री करणाऱ्यांचे घरावर मोर्चा नेला. या दारूबंदी मोर्च्याचे नेतृत्व अनिता अनिरुद्ध बांबोळे अध्यक्षा ग्रामसंघ, सचिन येसनसुरे सरपंच,राजानंद बांबोळे पोलीस पाटील, सदाशिव कापगते, संघमित्रा वाळवे,कल्पना वाळवे,गिता वाळवे,सिमा उईके,हेमलता मेश्राम,शालीनी वैद्य,मायावती वैद्य,इंद्रकांता गजभिये,मेघा कापगते,प्रिती बांबोळे,वंदना वाळवे सरीता कापगते,सुनीता वाळवे,वैशाली कापगते,निर्मला येसनसुरे यांनी केले.दारूबंदीच्या मोर्च्यात गावातील बचत गटाच्या २००महिलांचा समावेश होता.