सौंदळ येथे दुर्गा मंदिर चे भूमिपूजन करून कामाला सुरुवात.
1 min readगोंदिया,सडक अर्जुनी ,11 सप्टेंबर 2021, अस्लेश माडे(विशेष प्रतिनिधी)- बाल तरूण दुर्गा उत्सव मंडळ सौंदड यांच्या अथांग प्रयत्नाने शेवटी आज मंदिर चे भूमीपूजन करून कामाला सुरवात करण्यात आली. अनेक वर्षांपासून मां दुर्गा जीचे मंदिर तयार व्हायला पाहिजे या करिता मंडळाचे पदाधिकारी प्रयत्न करीत होते परंतू यश त्यांना यावर्षी आले.मोठे दानदाता श्री प्रकाश माचेवार यांच्या नावाने सुरुवात झाली.
म्हणून त्यांच्या हस्ते भूमीपूजन करून प्रमुख उपस्थितीत श्री रमेश जी चुर्हे व अशोक भाऊ लंजे माजी जि. प.सदस्य तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. मंदिर सुशोभित तय्यार व्हायला पाहिजे या करीता इंजीनियर श्री सत्यजित राऊत यांनी मार्गदर्शन केले उपस्थित गावकऱ्यांनी मंडळाचे कौतुक केले व मंदिर लवकर तयार करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री सदाभाऊ विठ्ठले ,बापुभाऊ भेंडारकर, पुरुषोत्तम निंबेकर, लक्ष्मण झोडे, इक्बाल शेख, नरेश शिवणकर, नामदेव डोये, प्रकाश शिवणकर, धनराज डोंगरवार, अशोक तरोणे, अमोल मेंढे, ओम प्रकाश यावलकर, सुभाष पुराण, भूमेश्वर शिवणकर, गोपाल भेंडारकर, माणिक चुहे,आनंदराव चांदेवार, राकेश शिवणकर, बाबुराव यावलकर, सुधाकर चांदेवार, खेमराज निर्वाण, ज्ञानेश्वर विठ्ठले, व सर्व गावकरी उपस्थित होते.