डव्वा ते खजरि मार्गावर अपघात :एकाचा मृत्यू.
1 min readगोंदिया,सडक – अर्जुनी,09 सप्टेंबर 2021- 05 सप्टेंबर सायंकाळ चे 5:00 दरम्यान प्रमोद पतीराम मारवाडे वय 34 रा. घटेगाव हे त्यांची हीरो आय स्मार्ट मोटर सायकल क्र. MH 35 Z 5860,
ने त्याच्या सोबती सुनील राजू शिवणकर वय 20 दोन्ही घटेगाव गाव इथे राहत असून , सडक अर्जुनी वरून घटेगावं ला जात असताना मौजा डव्वा ते खजरी वाघदेव मंदिराजवळ डांबरी रोडवर गोंदिया कडून समोरून येणारी बोलेरो पिकअप क्र. MH 40 CD 0721,
चे मालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने ,निष्काळजी पणाने लापरवाहीने चालवून फिर्यादी चे भावाचे मोटरसायकल ला धडक दिल्याने मोटरसायकल तुटफुट होवून फिर्यादी चे भाऊ व त्याच्या सोबती जखमी झाले . व उपचार दरम्यान फिर्यादी चा भाऊ प्रमोद मारवाडे यांचा मृत्यू झाला. फिर्यादी चे भाऊ उमेश पतिराम मारवाडे यांच्या तोंडी रिपोर्ट वरून समोरचा तपास डूग्गीपार पोलीस करीत आहेत.