डोंगरगाव येथील खोड्या तलाव दुरुस्त,करा गावकऱ्यांची मागणी,अनेक वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी, 09 सप्टेंबर 2021, अश्र्लेश माडे (विशेष प्रतिनिधी)- तालुक्यातील ग्राम डोंगरगाव खजरी या गावाच्या उत्तरेकडे मोठा शासकीय तलाव आहे. या तलावांमध्ये नाल्याचे पाणी आणल्यास तलावाची पाण्याची पातळी वाढेल त्याचा लाभ होईल विहिरी आणि जमिनीच्या सिंचनासाठी. व पाण्याची पातळी वाढेल याशिवाय पावसाळ्यात शेतकऱ्यांना ओलितासाठी फायदा होईल. डोंगरगाव च्या वरच्या भागातून नाला वाहतो पावसाळ्यात अनेकदा पूर येतो या नाल्यावर मोठा बंधारा बांधण्यात यावा या बंधाऱ्याच्या माध्यमातून नाल्याचे पाणी सरळ शासकीय खोड्या तलावात येईल पावसाळ्याची सुरुवात झाल्यानंतर त्याला पुराच्या पहिल्या पाण्याने तुडुंब भरून जाईल. ही अतिक्रमण शेती हटवून उंच पार करावे त्याचप्रमाणे रपट याची उंची वाढवण्यात यावी त्याचप्रमाणे संपूर्ण तलावाचे खोलीकरण करावे यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची समस्या भासणार नाही ही मागणी ग्रामपंचायत व गावकऱ्यांची अनेक वर्षापासून आहे मंत्र्यांना निवेदन देऊ नये मागणी अद्यापही पूर्ण झालेले नाही.
आसपासच्या सर्व गावांसाठी फायद्याचा असणारा हा तलाव आहे. तेव्हा ह्या खोड्या तलावाची दुरुस्ती करावी अशी मागणी तुळसिदास जी चौधरी, विनायक लांजेवार, यशवंत जी कठाणे,नीलकंठ जी कठाणे, नीलकंठ जी कोरे,मार्कंडजी कोरे, भानुदास डोये,सावजी हुकरे,यादवरावजी हुकरे तंटामुक्त समिती अध्यक्ष,कुंडलीक लांजेवार,सदारामजी भेंडारकर, कठाणे,अनिल जी कोरे, देवरावजी कोरे,अशोक हुकरे, पुरुषोत्तम राणे, उत्तमराव राणे,कृष्णा चौधरी, भोजरामजी कठाणे,अशोक डोये,चंदनजी डोये, कुणाल कठाने,भारत कोरे,दिनेशजी हुकरे सरपंच, तुकाराम जी राणे उपसरपंच,अमोल बनसोड सदस्य, संजीव डोये, फुल्लुके, आणि इतर ग्रामस्थांनी केली आहे.