News24 Today

Latest News in Hindi

मटण घेण्या करिता गेलेल्या मित्रांचा अपघात, एकाचा मृत्यू!

1 min read

गोंदिया,देवरी,08 सप्टेंबर 2021 – दिनांक 07 सप्टेंबर सकाळ चे 11 वा. दरम्यान प्रदीप धनगाये हा आपल्या मित्र लिकेश गावडकर व विनायक मधुकर गावड वय 26 वर्षे रा. चीचेवाडा यांचा सह मुरदोली फाटा येथे मटण घेण्या करिता गेले असता मटण घेऊन आपल्या मित्रासह बाईक क्र. MH 35 W 1117

ने आपल्या गावी जात असता समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ वाहन क्र. MH 40 AR 0107,

चे मालकाने आपल्या ताब्यातील वाहन हायगईने, लापरवाहिने, निष्काळजीपणे चालवून बाईक ला समोरून धडक मारून प्रदीप व लीकेश ला जखमी करण्यास व विनायक च्या मरण्यास कारणीभूत झाल्याने जखमींच्या बयान्या वरून व फिर्यादी पोलीस हवालदार चिरवतकर पोस्टे देवरी यांचे रिपोर्ट वरून अप क्र 224/2021 कलम 279/338/304(अ) भादवि सह कलम 184 मोवाका अनव्ये गुन्हा नोंद करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास पोना परसमोडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *