कवी अश्लेष माडे यांना साहित्य भूषण पुरस्कार जाहीर.
1 min readगोंदिया,सडक/अर्जुनी 07 सप्टेंबर 2021-
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा येथील युवक प्रीत कवी अश्लेष माडे यांना यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील बेटी फॉउंडेशन तर्फे देण्यात येणारा यंदाचा 2021 चा मानाचा आंतरराष्ट्रीय साहित्यभूषण पुरस्कार जाहीर झालेला आहे. सलग दुसऱ्यांदा अश्लेष माडे यांना बेटी फॉउंडेशन तर्फे देण्यात येणारा पुरस्कार जाहीर झालेला आहे. मागील वर्षी 2020 चा आंतरराष्ट्रीय कविरत्न पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालेला आहे. हे विशेष.
सदर 2021 च्या आंतरराष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्काराचे निवडपत्र बेटी फॉउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्ष प्रीती माडेकर (दरेकर)यांच्या हस्ते आज दि.7 सप्टेंबर रोज मंगळवारला देण्यात आले. त्यांच्या उत्कृष्ट साहित्याची दखल घेत सदर पुरस्कार जाहीर करण्यात आला. वणी येथील बेटी फॉउंडेशन तर्फे येत्या 26 सप्टेंबर 2021 ला वणी येथील प्रिन्स लॉन मध्ये संध्याकाळी 5 वाजता ह्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या उपस्थितीत या सोहळ्यात कवी, साहित्यिक, शिक्षक, समाजसेवक व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.