आमदार चंद्रिकापूरे यांनी घोग्रा घाटला दिली भेट.
1 min read
गोंदिया, सडक अर्जुनी, 05 सप्टेंबर 2021- आमदार मा.मनोहर चंद्रिकापूरे यांनी सडक/अर्जुनी तालुक्यातील कोदामेंडी येथील घोग्रा घाटला भेट दिली.

फुलेनगर, बोद्ध नगर, तिड़का, सडक अर्जुनी, ते घाटबोरी, सितेपार, खोदशिवनी, पंचवटी मुंडीपार माऊली येथील नागरिकांना येण्या-जाण्यासाठी अडचण निर्माण होत असल्याने तसेच बांधकाम झालेला पुल कम बंधारा हा खालून लीक असल्याने पानी साठा राहत नाही अशी तक्रार नागरिकांची होती म्हणून स्थळाला प्रत्यक्षात भेट दिली, नागरिकांची बंधार्यास लोखंडी गेट, बंधारा कम पूल रुंदीकरण, नदीपात्रावर वॉल, व मंदिरा सभोवताल सपाटीकरण करने,इत्यादि मागण्या माझ्या समोर सादर केल्या. देवाजी बानकर,जगन्नाथ लंजे, नाज़ुकराम झिंगरे, यशवंत चोपकर, प्रभुदास चोपकर,योगराज लवकर, व सबंधित गावातील शेतकरी उपस्थित होते.