मुंबई येथे वाडले डेंग्यू आणि मलेरिया चे रुग्ण
1 min readमुंबई वृत्तसेवा : मुंबईत कोरोना रुग्ण वाढू नयेत यासाठी उपाययोजना सुरू असून, डेंग्यू आणि मलेरियाचे रुग्ण वाढत असल्याने उद्या संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे अशी माहिती मुंबई मनपाच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान आपल्या परिसरात पाणी साचू नये यासाठी नागरिकांनी काळजी घ्यावी,महापालिका, राज्यसरकार, केंद्र सरकारकडून घालून देण्यात आलेली नियमांचे तंतोत पालन करावे असे आवाहन यावेळी महापौर पेडणेकर यांनी केले.
दरम्यान सामान्य नागरीक प्रतिसाद देतात मात्र काही राजकीय पक्ष नियम पाळत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कायद्यापेक्षा भाजप आणि मनसे ₹ला स्वतःहून कळायला हवे कोरोना किती घातक आहे असे त्या म्हणाल्या. दरम्यान आज सकाळपासूनच सोशल मीडियावर एका क्लीन-अप मार्शलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यात एक कार चालक क्लीन-अप मार्शलला कारच्या बोनेटवर फरपटत नेत आहे, तो व्हिडीओ गेल्या लॉकडाऊनचा आहे त्यासंदर्भात चौकशी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली. अशी बातमी मॅक्स महाराष्ट्र ने प्रकाशित केली.