गोंदिया- गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील एकमेव कम्प्युटर सेंटर, गुगल कम्प्युटर एज्युकेशन, चे संचालक जितेंद्र गिरधारी ब्राह्मणकर यांचा त्यांच्या IT क्षेत्रातील उत्कृष्ठ कामगिरीसाठी 17 सप्टेंबर रोजी नागपूर येथे MKCL तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सोहळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय परिषद व सांस्कृतिक केंद्र, कामठी रोड, नागपूर येथे MKCL चे M.D. मा. समीर पांडे सर, RLC शशिकांत देशपांडे सर, तसेच MKCL चे पदाधिकारी अतुल पतोडी सर, अमित रानडे सर, कुंदन रामटेके सर, दया कटरे मॅडम आणि गोंदिया जिल्ह्याचे LLC कॉर्डिनेटर उमेश वैद्य सर उपस्थित होते.
गुगल कम्प्युटर एज्युकेशन सडक अर्जुनीने जिल्ह्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले तसेच विविध कोर्सेस आणि आयटी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान शिकवण्यास महत्त्व दिले. या उत्कृष्ट कामगिरीसाठी जितेंद्र ब्राह्मणकर यांना जिल्ह्यातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 1000 क्लब कडून सन्मानित केले गेले.
जितेंद्र ब्राह्मणकर यांनी विद्यार्थ्यांना उच्च दर्जाची कौशल्ये प्राप्त व्हावीत, त्यांना संगणकाचा योग्य उपयोग करता यावा आणि नवीन तंत्रज्ञानाचा लाभ गोंदिया जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना मिळावा, या दृष्टीकोनातून सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले आहेत.
या यशामागील श्रेय त्यांनी त्यांच्या पत्नी, आई, भाऊ तसेच त्यांच्या संगणक शिक्षक शैलेश खोटेले, निशिकांत खोब्रागडे, पायल नेवारे, राखी कापगते, बिंदिया कोटवार, शुभम मडावी, प्रणय शेंडे, सचिन रामटेके, साक्षी तुरकर यांना दिले.