कोहमारा ; गावातील पथदिवे बंद असल्यामुळे गांवकऱ्यानी मोबाईल टोर्च लाऊन केला निषेध.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी – काही दिवसापासून कोहमारा गावातील ‘पथदिवे’ बंद असल्यामुळे गावातील नागरीकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जात असतानी गावामधे अंधार असल्यामुळे अपघात होण्याची देखील शक्यता आहे. एकीकडे पावसाचे दिवस सुरु असल्यामुळे सांपांची भिती निर्माण झाली असुन एखादया नागरीकाचा अपघात होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही .
त्यासाठी ह्या विषया कडे संबंधित विभागाने तातळीने लक्ष घ्यावे यासाठी गावाकऱ्यानी मोबाइल ची टोर्च लाउन निषेध केला. त्यामधे गावातील महिला आणि युवा मिथुन शाहरे, विशाल मेश्राम, राजन गजभिये,गुलशन वरकड़े,कृपेश राउत,राहुल भिमेट, रुपेश बड़ोल,व इतर गावकरी होते.

