घरात आढळला तब्बल 5 फुटाचा नाग साप…
1 min read
गोंदिया, सडक अर्जुनी – पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अनेक ठिकाणी सापाचे दर्शन होत आहे. तसेच गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यात येणाऱ्या कोहळीटोला गावातील रहिवासी राहुल शेंडे यांच्या राहत्या घरी दी. 24 जुलै 2022 रोजी सकाळी 5 वा. दरम्यान कोंबड्यांचे गर्ल सुरू झाले.
कोंबड्यांच्या दडव्यात जाऊन बघितले असता तिथे नाग जातीचा 5 फूट लांब साप आढळल्याने खळबळ उडाली .घरात साप असल्याचे कळताच शेंडे यांनी सृष्टी फाउंडेशन संस्थेच्या सर्पमित्रांना फोन करून माहिती दिली. सर्पमित्रांनी सापाला कोंबडीच्या दडव्यातून बाहेर काढले मात्र त्याच पोट पूर्ण भरलेले होते. सापाला पळता येत नसल्याने त्याने शिकार करून खाल्लेलं कोंबडीचे अकरा आंडे ओकून काडले . व सर्पमित्रांनी सापाला जीवनदान देत शाशिकरण जंगलात सोडण्यात आले साप पकडते वेळी ग्रामस्थांसोबत संस्थेचे सर्पमित्र शुभम नंदेश्वर, राज खोब्रागडे, हर्ष राऊत, मोहित नंदागवळी आधी उपस्थित होते.

