बार्टीच्या युवा गटांचा उद्योजकीय समारोपीय कार्यक्रम व वृक्षरोपण.
1 min read
गोंदिया, सडक अर्जुनी –डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र गोंदिया यांच्या सयुक्त विद्यमाने आयोजित बार्टीच्या समतादूत यांच्या मार्फत स्थापन करण्यात आलेल्या अनुसूचित जातीच्या युवक व युवती गटाकरिता बार्टी तर्फे उद्योजकीय विकास प्रशिक्षण दिनांक 21/6 ते 20/7/2022 एका महिन्याचा अनिवासी कार्यक्रम सडक/अर्जुनी येथे राबविण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दीप प्रज्वलन व माल्यार्पण करुण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा. जितेन्द्र मौर्य (संचालक रा. शाहू म. कॉलेज) हे होते प्रमुख पाहुने मा. शारदा कड़सकर (प्र.अ. बार्टी गोंदिया) मा. संदीप जाने (प्र.अ. गोंदिया) मा. संदेश ऊके (समतादूत सडक/अर्जुनी) मा. महेन्द्र कटबर्ये, मा.राजरत्न मेश्राम, मा.साजन वासनिक, मा. शेखर मेश्राम (समन्वयक) व प्रशिक्षणार्थी यांच्या उपस्थितित पार पड़ला.
मान्यवरानी प्रशिक्षणातील लाभार्थी यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या या महिन्याभराच्या निशुल्क अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योगा विसई उद्योग उभारनी, व्यक्तिमत्व विकास, उद्योगसाठी विविध परवाने,बाजारपेठ सर्वेक्षण,निधि उभारनी, डिजिटल मार्केटिंग, कृषि योजनाची माहिती,प्रकल्प अहवाल तयार करने,बँक प्रक्रिया,शासकीय योजना लाभ घेणे,उद्योग भेटी असे परिपूर्ण प्रशिक्षण देऊन युवकांना उद्योग उभारण्याकरिता व आत्मनिर्भर करण्याकरीता प्रशिक्षण आयोजित केले होते कार्यक्रमाच्या अनुसंगाने सरतेशेवटी समतादूत प्रकल्पाअंतर्गत 101 वृक्षरोप लागवड करुण कार्यक्रमाची सांगता करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमात सूत्र संचालन शेखर मेश्राम यांनी केले तर तर आभार समतादूत संदेश ऊके यांनी मानले.

