कोहमारा येथे तलाठी कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत तहसीलदारांना दिले युवकांनी निवेदन.
1 min read
कोहमारा येथे तलाठी कार्यालय नसल्याने चिखली येथील तलाठी कार्यालय कोहमारा येथे स्थलांतरीत करण्याबाबत तहसीलदारांना दिले युवकांनी निवेदन
गोंदिया,सडक/अर्जुनी,- ग्राम कोहमारा येथे तलाठी कार्यालय नसल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोहमारा हे मोठ्या लोकवस्तीचे गाव आहे मात्र अद्यापही येते त्याला ते कार्यालय नाही. अनेक तालुक्याचे मुख्यालय असलेल्या सडक-अर्जुनी येथे तलाठी कार्यालय होते. त्यामुळे कोणत्याही कामासाठी सडक-अर्जुनी ला 2 किलोमीटर जावे लागत असे. आणि आता तलाठी कार्यालय चिखली येथे असल्याने कोहमारा येथील नागरिकांना चिखलीला 3 किलोमीटर जावे लागते. नुकतीच शाळा सुरू झाली असून विद्यार्थ्यांना अनेक कागदपत्रांची गरज असते त्यामुळे त्यांना तलाठी कार्यालयात जावे लागते. मात्र सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने. व तलाठी कार्यालय दूर असल्याने, विद्यार्थी म्हातारे व इतर नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन चिखली येथील तलाठी कार्यालय कोहमारा येथे स्थलांतरित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज दि 7 जुलै रोज गुरुवारला मा. तहसीलदार सडक अर्जुनी यांना कोहमारा येथील युवकांनी दिले.निवेदन देतेवेळी पत्रकार अश्लेष माडे, प्रवीण उके, बबन बडोले, शैलेश लाडे, पदम मेश्राम, अनमोल निखूरे, सागर कोटांगले, रजनीकांत बडोले आदी युवक उपस्थित होते.
