आमदार चंद्रिकापुरे यांनी नवेगांव बांध येथे उपोषणास बसलेल्यांचे संदर्भात मुख्य वनसंरक्षक यांचेशी घेतली भेट.
1 min read
गोंदिया- नवेगांव बांध क्षेत्रातील ग्रामपंचायतीनी संकलीत केलेला तेदुपत्ता वनविभागाचे अधिकाऱ्यांनी यांनी जप्त केला असून या अन्यायकारक कारवाई विरोधात सबंधित ग्रामपंचायतीचे पदाधिकारी गेल्या ८ दिवसापासून आमरण उपोषणावर बसले आहेत . मात्र वनविभागले जिल्हास्तरीय अधिकान्यांची त्यांची दखलच घेतली नसल्यामुळे मा. आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली व उपवनसंरक्षक, वनसंरक्षक यांना उपोषण कर्त्याच्या न्याय मागण्या मान्य करणे व त्यांचे वरील कारवाई थांबविणे बाबत सूचना केल्या व त्याशिवाय आज दि १३ जून २०२२ रोजी मुख्य वनसंरक्षक श्री नायकवाड यांची भेट घेतली. मुख्यवनसंरक्षक श्री नायकवाड यांनी उपवनसंरक्षक श्री कुलराज सिंग यांना उपोषणकर्त्यांची तात्काळ भेट घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत व प्रस्तावित कारवाई न करणेबाबत सुचना दिल्या . मा . आमदार चंद्रिकापुरे यांचे मध्यस्थीमुळे उपोषण कर्त्यांचा प्रश्न मार्गी लागला आहे .
