पेट्रोल डिझेल च्या कमी झालेल्या दरामुळे नागरिक असंतुष्ट.
1 min read
गोंदिया, दींनाक : 23 मे 2022 : जिल्ह्याच्या वतीणे राष्ट्रवादी पक्षाने 20 मे 2022 रोजी राष्ट्रीय महामार्गावर डिझेल, पेट्रोल, आणि गॅस सह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन आंदोलन केले तसेच तहसीलदार मार्फत निवेदन केंद्र सरकारला पाठविले यौगा यौग म्हणा किंवा आंदोलनाची दखल केंद्र सरकारने घेतली आणि 21 मे रोजी पेट्रोल , डिझेल, गॅस चे दर कमी केले एकंदरीत केंद्राने सर्वसामान्यांना मोठा दिलासा गॅस सिलिंडरवर 200 रुपये, डिझेलवर 7 रुपये आणि पेट्रोलवर 9.50 रुपयांची कपात करण्यात आली आहे.
मात्र याच पास्वभुमिवर सडक अर्जुनी तालुक्यात नागरिकांची प्रतिक्रया घेतली असती नागरिकात नाराजीचा सूर आहे, युक्रेन आणि रशिया युद्ध दरम्यान अचानक देशात क्रूड ऑइल चे भाव वाढल्याचे सांगत 80 पेश्याने रोज दरवाढ करण्यात आली होती त्याच बरोबर भाडेवाढ झाले आणि किराणा सामान, गोडेतेल, भाजीपाला सह अन्य साहित्याची देखील मोठ्या प्रमाणावर वाढ झाली मात्र भाव कमी करताना पाहिजे त्या प्रमाणात कमी करण्यात आले नसल्याचे नागरिक सांगतात, त्याच बरोबर शिवसेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे, तर अर्जुनी मोरगाव विधान सभा छेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे.
