देवरी; कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे शहरवासी संतापले.
1 min read
• वीजेच्या कमी दाबामुळे पंखे,कुलर व टीव्ही या उपकरणाचे मोठे नुकसान.
देवरी – देवरी शहरामध्ये विजेच्या दाबाची मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे पंखे,कुलर व टीव्ही या इलेक्ट्रिक उपकरणाचे चे मोठे नुकसान होत असल्याने नागरिक संतापल्याचे वृत्त आहे.
यात सविस्तर वृत्त असे की,वाढलेले विज बिल आणि आता कमी वोल्टेज ची समस्या लोकांना परवडणारी नसून जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. एकी कडे वीज वितरण कंपनी निवासी ग्राहकांच्या स्थिर आकारासह स्लॅबनुसार प्रतियुनिट वाढ केली आहे. वाढीव वीज दराची बिले वीज ग्राहकांना शॉक देणार आहेत. त्यामुळे उन्हासह वाढीव बिल घाम काढणार असल्याने ग्राहकांत नाराजीचा सूर दिसून येत आहे. त्याच बरोबर पंखे , कूलर व्यवस्थित चालत नसून कमी वीज दाबामुळे उपकरणे मोठ्या प्रमाणात बिघडत असल्याचे लोकांच्या तक्रारी समोर येत आहेत. तरी वीज वितरण कंपनीने लोकांच्या विजेच्या कमी दाबाच्या या समेस्येची दखल घेवून या समस्येचे निराकरन करावे असी मागणी देवरी शहरवासी यांनी केली आहे.
