वनवा मुक्त “जंगल” जनजागृती कार्यक्रमाचे गट ग्रा.पं.मिसपीर्री येथे आयोजन.
1 min read
गोंदिया, देवरी, – देवरी तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी बहुल व नक्षलग्रस्त गट ग्रामपंचायत मिसपीर्री ही मिसपीर्री, धमदिटोला, ऐळमागोंदी, मांगाटोला, गुजूरबडगा, लक्षात व शंभुटोला असे एकूण सात गाव मिळून एक मिसपीर्री गट ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. ही गावे विविध वन संपदेणे नटलेली भूभाग आहे. जागतिक वन दिवसा निमित्य “वनवा मुक्त जंगल” या संकल्पनेतून मिसपीर्री चे उपसरपंच जीवन सलामे यांच्या पुढाकाराने येथील ग्रामपंचायत च्या सर्व पदाधिकारी व सात गावातील १५-१५ युवकांची संयुक्त सभा रविवारी(ता.२० मार्च) रोजी येथील ग्रा.पं.भवनात घेण्यात आली.
ही सभा ग्रा.पं.चे उपसरपंच जीवन सलामे, माजी सरपंच दुर्गेश कुंभरे, तुलाराम उईके यांच्या सह ग्रा.पं.चे सर्व पदाधिकारी सदस्य आणि प्रत्येक गावातील १५-१५ सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.
या सभेत सविस्तर चर्चा करण्यात आली की सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून उन्हाचे चटके लागायला सुरुवात झाली आहे. या उन्हाळ्याच्या दिवसात जंगलात वनवा लागण्याचे प्रमाण वाढते. अशा वनव्यामुळे पावसाळ्यातील उगवलेले रोपटे जाळले जातात. यात जंगलाचा ऱ्हास होतो. तसेच जंगलातील अनेक जीव जंतू व वन्यप्राण्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतो.
करीता “वनवा मुक्त जंगल” या संकल्पनेतून मिसपीर्री चे उपसरपंच जीवन सलामे यांच्या पुढाकाराने व ग्रा.पं.च्या सर्व पदाधिकारी, सदस्य व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नाने जंगलात वनवा लागू नये म्हणून या सभेत जनजागृती करण्यात आली. या अभियाना अंतर्गत ग्रा.पं.हद्दीतील प्रत्येक गावातील १५-१५ युवकांची समिती स्थापन करून या समिती मार्फत गावातील प्रत्येक नागरिकांचा जागृत करण्यात येत आहे.
या सभेच्या माध्यमातून “वनवामुक्त जंगल” संकल्पनेला प्रतिसाद देत उपस्थित सर्व नागरिकांनी वनवा लावू नये म्हणून प्रयत्न करण्याची हमी दिली जर चुकीने वनवा लागलेच तर ज्यांच्या नजरेस प्रथम दिसले तर त्यांनी वनवा नियंत्रणात आणण्यास समितीला सहकार्य करण्याची गवाही यावेळी सर्वांनी दिली.
यावेळी मिसपीर्रीचे उपसरपंच जीवन सलामे, माजी सरपंच दुर्गेश कुंभरे व तुलाराम उईके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
