news24today

Latest News in Hindi

अर्जुनी मोरगाव येथील साई सर्वेश्वर बार मध्ये झालेल्या चोरीचा तपास लावून पोलिसांनी चोरांना टाकले तुरुंगात.

1 min read

दिनांक ०१/०३/२०२२ रोजी पहाटे अर्जुनी-मोर मधील साई सर्वेश्वर बार मध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोडी चोरी करून सुमारे १,८४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी तात्काळ अपराध क्रं. ६३ / २०२२ भा.द.वि. कलम ४५७, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला व गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांच्याकडे दिला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल पाटील व पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरून मिळालेले भौतिक पुरावे सीसीटीवी फुटेज मधून मिळालेले आरोपींचे वर्णन, गोपनीय बातमीदारांकडून माहिती काढून तसेच तांत्रिक व शास्त्रीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने २ आरोपी दीपक राणा व सुशांत मिस्त्री रा. दोघे वडसा यांना अटक केली. अर्जुनी-मोर पोलिसांनी या आरोपींकडून सुमारे १,०५,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. गुन्हयातील आरोपी यांना माननीय न्यायालयात हजर केले असता दिनांक ०७/०३/२०२२ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

गुन्ह्याचा तपास मा. प्रभारी पोलीस अधीक्षक गोंदिया श्री अशोक बनकर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी देवरी श्री संकेत देवळेकर व पोलीस निरीक्षक चंद्रकांत सूर्यवंशी, युवराज हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम, राहुल पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोपाळ कापगते, चंद्रकांत करपे तसेच पोलीस नाईक प्रवीण बेहरे, रमेश सेलोकर, गौरीशंकर कोरे, श्रीकांत मेश्राम, चालक पोलीस शिपाई मुरली पांडे यांनी केला आहे. या गुन्ह्याच्या तपासामध्ये सायबर सेल गोंदियाचे पोलीस नाईक दीक्षित दमाहे यांनी मोलाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *