१३ वी महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट नेमबाजी स्पर्धेत स्वर्ण व रजत पदके प्राप्त केल्याने मा.पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांचे हस्ते सत्कार.
1 min read

दिनांक ०१/१२/२०१९ ते ०४/१२/२०१९ पर्यंत रा.रा.पो. बल गट क्र ०१ पुणे येथे झालेल्या १३ वी महाराष्ट्र पोलीस स्पोर्ट नेमबाजी स्पर्धेत गोंदिया पोलीस दलातील पोलीस हवालदार /१७१४ नैलेश शेंडे यांनी ३०० .मीटर प्रोन पोजिशन रायफल प्रकारात सुवर्ण व ३०० मीटर थ्री पोजिशन रायफल प्रकारात रजत पदक प्राप्त केले असुन त्यांचा दि.१०/०२/२०२२ रोजी मा. पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांचे हस्ते पोलीस महासंचालक कार्यालय मुंबई येथे सत्कार करण्यात आला त्यांनी गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्वल केले आहे. त्यांची अखिल भारतीय शुटींग स्पर्धेसाठी निवड झालेली आहे.
पोलीस अधिक्षक श्री. विश्व पानसरे व पोलीस उपअधिक्षक (गृह) श्री. दिनकर ठोसरे व राखीव पोलीस निरीक्षक श्री. रमेश चाकाटे, राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री. मोरेश्वर लोहारे यांनी पोलीस हवालदार नैलेश शेंडे यांना त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबदल अभिनंदन करुन त्यांना गोंदिया पोलीस दलाकडुन पुढील स्पर्धेसाठी हार्दीक
शुभेच्छा दिल्या आहेत.