बंडखोर वाळू चोरांचा पिपरी घाट वर ठिया, कारवाईची मागणी.
1 min read
•तलाठी साहेब झाले हतबल, मार्गावर खड्डे मारून देखील चोरी चालूच…

गोंदिया, सडक अर्जुनी, 09 फेब्रुवारी 2022- तालुक्यातील ग्राम सौंदड येथून जाणाऱ्या चुलबंद नदीच्या नदी पात्रातून अवैधरित्या वाळूची तस्करी जोमात चालू असल्याचे अनेक वृत्त न्युज 24 टुडे ने प्रसारित केले, त्यावर संबंधित प्रशासनाने कारवाई देखील केली मात्र अवैध रेती उपसा थांबता थांबेना असे चित्र पाहण्यास मिळत आहे, स्थानिक तलाठ्यांनी नदीच्या घाटावर जेसीबी द्वारे खड्डे निर्माण करून अवैध रेती वर नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना केली, मात्र अन्य ठिकाणाहून रस्ता तयार करून पुन्हा वाळू चोरीला सुरुवात करण्यात आली आहे.
त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे, पिपरी नदीच्या घाटावरील पुलाच्या बाजूला अशलेल्या विट भट्टीवरून आता नव्याने मार्ग तय्यार करून वाळूचा उपसा केला जात आहे, ही वाळू विट भट्टीवर साठउन ट्रॅक च्या माध्यमातून बाहेर विक्रीसाठी पहाटे रवाना केली जाते, त्या मुळे रोज शासनाला लाखोचा चुना लागत आहे, प्राथामिक माहिती नुसार लाल विटा निर्मिती करण्यास शासनाकडून बंदी अस्तांहा देखील लाल विटांची निर्मिती सौंदड परिसरात केली जाते, यावर संबंधित यंत्रणेने कारवाई करण्याची मागणी होत आहे.