गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वर गोळीबार झाडून जिवेमारण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच आरोपींना अटक.
1 min read
• मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधिक्षक सो, गोंदिया यांच्या मार्गदर्शनाखाली गोळी झाडून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणा-या पाच आरोपीतांना अटक

गोंदिया,31 जानेवारी 2022-दिनांक २८/०१/२०२२ रोजी १७.३० वा दरम्यान फिर्यादी धनेंद्र शिवराम भुरले वय ५२ वर्ष रा. नेहरु वार्ड गोंदिया हे टेमनी येथील आपले शेतात गेले असता परत येत असतांनी मौजा टेमणी ते कटंगी रोडवर असलेले महाराजा धाब्याचे जवळ दोन अनोळखी इसमांपैकी मोटार सायकलवर मागे बसलेल्या इसमाने आपल्या जवळील अग्निशस्त्राने फिर्यादीस जिवे ठार मारण्याचे उद्देशानी गोळी (राऊंड) झाडुन, ती गोळी फिर्यादीचे उजव्या गालात घुसल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. फिर्यादी हे जखमी अवस्थेत पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथे गेले असता पो.नि. महेश बनसोडे, पो.स्टे. गोंदिया शहर यांनी क्षणाचाही विलंब न करता फिर्यादीस औषधोपचार कामी के.टी.एस शासकीय रुग्णालय गोंदिया येथे घेवून गेले. फिर्यादी कडे विचारपुस करुन घटनास्थळ रामनगर पोलीस स्टेशन येथे निश्चित झाल्याने रामनगर पोलीस स्टेशन येथे माहिती देवून मा. श्री. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे सह घटनास्थळी भेट दिली.
फिर्यादी यांनी रुग्णालयात दिलेल्या बयाणावरून व वैद्यकीय अहवालावरुन पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक १५/२०२२ कलम ३०७, १२० (ब) भा.दं.वि. सहकलम ३,२५,२७ भारतीय हत्यार अधिनियन सन १९५९ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. नमुद गुन्हयाचे गांभीर्य पाहून मा. श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी स्थानिक गुन्हे शाखेस व पोलीस स्टेशन गोंदिया शहर व पोलीस स्टेशन रामनगर यांना सदर गुन्हयात अनोळखी आरोपी यांना तात्काळ अटक करण्याचे निर्देशीत केल्याने त्यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया व पोलीस स्टेशन गोदिया शहर व रामनगर यांचे तपास पथके तयार करण्यात आले.
सदर तपास पथकाने जलद गतीने तपासाची चक्रे फिरवत फिर्यादीतील नमुद आरोपी उदय गोपलानी व आरोपी गणेश जाधव यांना अटक केली. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने उदय गोपलानी याचेकडे जमीन विक्रीचे व्यवसायात मदत करणारे निरज गुरलदास वाधवानी वय ४६ वर्षे रा. माताटोली, बाराखोली, गोंदिया यांस ताब्यात घेवून त्यास विचारपुस केली असता त्याने नामे नरेश नारायण तरोणे ३५ वर्ष रा. आर.टी.ओ. ऑफीसचे मागे, फुलचुर, गोंदिया याने शिवशंकर भैय्यालाल तरोणे वय ३३ वर्षे, रा. इरी पोष्ट नवरगाव ता. जि. गोंदिया याचे सोबत मोटार सायकलने घटनास्थळी जावुन अग्निशस्त्राचा वापर करून गोळी झाडुन फिर्यादीस जिवाने ठार मारण्याच्या उद्देशाने जखमी केले असे सांगितले त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा तपास पथकाने गोपनीय बातमीदार नेमुन आरोपी,
नरेश नारायण तरोणे व आरोपी विजयशंकर भैय्यालाल तरोणे यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याचे कबुल केले आहे.
आरोपी क्रमांक ०१) उदय देवीदास गोपलानी वय ३९ वर्ष रा. हनुमान मंदीर जवळ, सिव्हील लाईन, गोंदिया, आरोपी क्रमांक ०२) गणेश पंडीतराव जाधव वय ४५ वर्ष रा. मामा चौक, चवथी गल्ली, सिव्हील लाईन गोंदिया, आरोपी क्रमांक ०३) नरेश नारायण तरोणे ३५ वर्ष रा. आर.टी.ओ. ऑफीसचे मागे, फुलचुर, गोंदिया आरोपी क्रमांक ०४) नामे निरज गुरलदास वाधवानी वय ४६ वर्षे रा. माताटोली, बाराखोली, गोंदिया तसेच आरोपी क्रमांक ५) नामे शिवशंकर भैय्यालाल तरोणे वय ३३ वर्षे, रा. इरी पोष्ट नवरगाव ता. जि. गोंदिया यांना नमुद गुन्हयात २४ तासाच्या आत अटक करण्यात आले असुन आरोपी हे पोलीस कोठडी रिमांड मध्ये आहेत. तपास सुरु असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक कठाळे, पोलीस स्टेशन रामनगर हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. विश्व पानसरे पोलीस अधीक्षक, गोंदिया यांचे मार्गदर्शनाखाली श्री. महेश बनसोडे, पो.नि. पो.स्टे गोंदिया शहर, श्री. बबन आव्हाड पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया, श्री. देवीदास कठाळे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. रामनगर, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि राहुल पाटील, पोउपनि तेजेन्द्र मेश्राम जिवन पाटील सफौ, गोपाल कापगते पोहवा राजु मिश्रा, पोना महेश मेहर तुलसीदास लुटे पोशि विजय मानकर, संतोष केदार, दिक्षीत दमाहे धनंजय शेंडे, संजय मारवाडे, पोना चौधरी बिसेन, चव्हाण यांनी या कार्यवाही मध्ये सहभाग घेतला आहे. त्याबद्दल पोलीस अधीक्षक, गोंदिया यांनी या कामगिरी मध्ये सहभागी अधिकारी व अमंलदार यांचे अभिनंदन केले आहे.