news24today

Latest News in Hindi

देवरी येथे रोजगार हमी योजनेची आढावा बैठक उत्साहात.

1 min read


■ आमदार कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन.

Ad

गोंदिया,देवरी, 24 जानेवारी 2022- देवरी येथील तहसील कार्यालयाच्या सभगृहात ग्रामीण भागातील जनतेकरिता रोजगार निर्मितीचे उद्देश समोर ठेवून या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांनी एम.आर.जी.एस.ची आढावा बैठक शुक्रवार(ता.२१ जानेवारी) रोजी आयोजित केली होती.
ही आढावा बैठक आमदार सहषराम कोरोटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी आमदार कोरोटे यांनी तालुक्यातील ग्रामीण भागातील लोक रोजगाराच्या शोधात जास्त प्रमाणावर शहराकडे धाव घेतात. हा होणारा पलायन थांबविन्याकरिता मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिति करने गरजेचे आहे. या करीता जास्तीत जास्त प्रमाणावर रोजगार हमीचे कामे सुरु करने आवश्यक आहे. यासाठी शासकीय यंत्रनेने मोठ्या प्रमाणावर रोजगार हमी कामाचे आरखडा तैयार करण्याचे अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या बैठकीत येथील तहसीलदार किशोर बागड़े, नायब तहसीलदार अनिल पवार, गटविकास अधिकारी चंद्रमणि मोडक, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राधेश्याम बगड़िया, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप गुप्ता, ओमराज बहेकार, नरेश राऊत, सरपंच सोनू नेताम, भारती सलामे केशोरी, नितेश भेंडारकर सिरपुरबांध, कमलेश पालीवाल यांच्यासह तालुक्यातील सरपंच, ग्रामसेवक, वनविभाग, कृषि विभाग, रोजगार हमीचे अधिकारी, कर्मचारी व काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
या बैठकीत अनेक ग्रामसेवक ग़ैरहजर असल्याने संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश ही आमदार कोरोटे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीचे संचालन व प्रास्ताविक नायब तहसीलदार अनिल पवार यांनी करुण उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *