नागपूर मधली मालविका बनसोड ने सायना नेहवालला केल पराभूत.
1 min read
बॅडमिंटन क्वीन सायना नेहवालला दोन सरळ सेटमध्ये पराभूत करत नागपूरच्या मालविका बनसोडने इतिहास निर्माण केला आहे. या विजयाबरोबर बॅडमिंटनमध्ये सायना, पी.व्ही.सिंधू यांच्यानंतरही देशासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकण्याकरीता नवीन पिढी सज्ज असल्याचे मालविकाने दाखवून दिले आहे.
मुळची नागपूरच्या असणाऱ्या मालविका बनसोडने इंडियन ओपन बॅडमिंटन टुर्नामेंटमध्ये इतिहास घडवला आहे. २० वर्षांच्या मालविकाने सायना नेहवालला पराभूत करत बॅडमिंटन जगतामध्ये खळबळ उडवून दिली आहे. मालविकाने सायनाला २१-१७ आणि २१-०९ अशा सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले आहे. जागतिक क्रमावारीत सायना २५ व्या तर मालविका १११व्या क्रमांकावर आहे.
मालविकाच्या या यशाबद्दल महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष आणि विश्वराज ग्रुपचे प्रमुख अरुण लखानी यांनी तिचे अभिनंदन केले आहे. तसेच २०१९पासून तिला लखानी यांनी मदत देखील केली आहे. “मालविकाने मिळवलेले यश प्रचंड मोठे आहे, पण ते अनपेक्षित नक्कीच नाही. तिच्यात प्रचंड क्षमता आहे. मोठ्या स्तरावरील स्पर्धा खेळून देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करण्याची तिची क्षमता आहे. तिचे भविष्य उज्ज्वल आहे. मालविकाचे प्रशिक्षक संजय मिश्रा आणि तिच्या आई-वडिलांच्या अथक परिश्रमांचे हे फळ आहे.” या शब्दात लखानी यांनी मालविकाचे कौतुक केले आहे.