ग्रा. प कोहमारा येथे महिला शिक्षण दीन साजरा करण्यात आला तसेच ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाले.
1 min read

गोंदिया,सडक अर्जुनी,22 जानेवारी 2022-ग्रामपंचायत कोहमारा येथे दि.03 जानेवारी 2022 ला सरपंच वंदनाताई थोटे यांच्या मार्गदर्शनानुसार स्त्री शिक्षणाच्या प्रनेत्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती “महिला शिक्षण दिन” म्हणून साजरी करण्यात आली तसेच जयंतीचे औचित्य साधून ग्राम संघ कार्यालयाचे उद्घाटन सुद्धा करण्यात आले.
तसेच उपस्थित मा.वंदनाताई थोटे सरपंच,मा. रेखाताई गाहाने ग्रा. प सदस्य, मा. सरिता जनबंधु ग्रा. प सदस्य, मा. विद्या कुंबरे ग्रा. प सदस्य, मा.सचिन टेभूर्णे ग्रा. प सदस्य, मा. रोशनी साखरे सी.आर.पी., मा.संदेश ऊके समतादुत बार्टी मा. माया उइके, मा.हर्षा राउत, मा. हटवार मैडम, मा. भगत मैडम मा. लितेश कोसलकर परिचर,आंगनवाड़ी सेविका तसेच ग्रामवासी इत्यादि मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले.