शरदचंद्र पवार यांचा 81वा वाढदिवस कोहमारा येथे केक कापून साजरा करण्यात आला.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,13 डिसेंबर 2021-कोहमारा येथेल एरिया 51 येथे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार शरदचंद्र पवार यांचा 81 वा वाढदिवस केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला आ.मनोहर चंद्रिकापुरे राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष मा.गंगाधर परशुरामकर, तालुका अध्यक्ष डॉ अविनाश काशिवार, माजी जि.प सदस्य रमेश चुरहे, माजी. नगराध्यक्ष देवचंद तरोणे, तालुका महिला अध्यक्ष रजनीताई गिरेपुनंजे, अजय लांजेवार, माजी नगराध्यक्ष रीताताई लांजेवार, माजी प.स सदस्य मंजुताई डोंगरवार, सरपंच वंदनाताई थोटे, शुभांगीताई वाढवे, आनंद अग्रवाल,प्रियंक उजवने, सरपंच शेरुखा पठान, दिलीप गभने, उमराव मांढरे, शिवाजी गहाणे, समीक्षा उदापुरे, ईश्वर कोरे, मतीन शेख,भागवत झिंगरे, प्रशांत बालसंवार,सुबुर शेख, फारुख शेख, कैलाश जांभुळकर, राहुल यावलकर,पिंकू भीमटे उज्जवल चौधरी, आदि मान्यवर उपस्थित होते.

राज्यात पवार साहेबांच्या नेतृत्वमुळे आघाडी सरकार स्थापन करण्यात आला असुन आज ही सरकार ज्या प्रमाणे टिकून आहे ती पवार साहेबांच्या नेतृत्वमुळे हे आम्हाला मान्य करावा लागेल, तशीच परिस्थिती कायम राहिल्या येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीमध्ये केंद्र व राज्यात पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन होणार असे प्रतिपादन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, डॉ. अविनाश काशिवार, रमेश चुरहे,अजय लांजेवार यांनी सुद्धा शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपले विचार व्यक्त केले.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.