कोहमारा ग्रामपंचायत येथे संविधान दिन उत्साहात साजरा.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,कोहमारा,26 नोव्हेंबर 2021-२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानुषंगाने सडक अर्जुनी तालुक्यातील कोहमारा ग्रामपंचायत येथे २६ नोव्हेंबर 2021 रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोहमारा ग्रामपंचायतीचे सरपंचा सौ. वंदनाताई थोटे तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायतीचे सदस्य, सचिव, व गावातील युवक उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत मध्ये सकाळी ११ वाजता दरम्यान संविधान दिवसाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.