एस.टी.बस लवकरात लवकर सुरू करण्यासाठी
अखिल भारतीय बापू युवा संगठन यांनी दिले तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन.
1 min read

गोंदिया,गोरेगाव,26 नोव्हेंबर 2021-अखिल भारतीय बापू युवा संगठन गोरेगाव च्या वतीने दिनांक २६/११/२०२१ रोजी गोरेगाव तहसिल कार्यालय तहसीलदार सचिन गोस्वामी यांचा मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले,
३१/१०/२०२१ रोजी पासून एस. टी. बस बंद असल्यामूळे शाळेतील विद्यार्थ्यांना बस बंद असल्यामूळे शाळेत जाण्या येण्या करीता कठीण झाले आहे.
त्यामूळे अखिल भारतीय बापू युवा संगठन चे पदाधिकारी यांचा जवळ समस्या मांडली. त्यामूळे विद्यार्थांन सोबत बोलणी केली असता विद्यार्थ्यांनी आपले मत व्यक्त केले असता त्यांच्यावर येणारे संकट सहन करण्याची पाळी आली आहे असे त्यांनी सांगितले,

काय सांगितले ते सविस्तर जाणुन घेऊया- विद्यार्थांनी आपले मत व्यक्त करत असताना सांगितलें की प्रावेट वाहना मध्ये जाण्या येण्या करीता टिकिट ची समस्या मांडली आहे व तसेच प्रत्येक दिवसाला टीकटीचे पैसे कुठून आणायचे अशी समस्या शाळेत जाणारे येणारे विद्यार्थांचा घरामध्ये निर्माण झाली आहे तसेच आज एस टी बस बंद असल्यामूळे कित्येकतरी विध्यार्धी घरी बसून आहेत व त्यांचा शिक्षणार फार मोठी समस्या निर्माण झाली आहे.
तसेच गोरेगाव तालुक्यातील जांभूळपाणी, सोदलागोंदि ,गराडा , पिंडकेपार, असे कित्येकतरी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बंद असल्यामूळे जंगल परिसरातील विद्यार्थ्यांना चे शिक्षणाचे नुकसान होत आहे.
एस टी बस लवकरात लवकर सुरु करा अशी मागणी अखिल भारतीय बापू युवा संगठन चे पदाधिकाऱ्यानी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
निवेदन देते वेळी उपस्थित अखील भारतीय बापू युवा संगठन गोंदिया जिल्हा मिडिया प्रमुख देवेंद्र दमाहे, उप मीडिया प्रमुख सुरेश साठवणे, रंजीत वालदे बापू युवा संगठन कार्यकर्ता दीपक बोपचे बादल कटरे अन्य बापू युवा संगठन चे समस्त पदाधिकारी उपस्थित होते.
