रेती चोरून वाहतूक करणारे आरोपी वनविभागाच्या ताब्यात, स/अर्जुनी तालुक्यातील प्रकरण.
1 min read
गोंदिया, सडक अर्जुनी,23 नोव्हेंबर 2021 – वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या जमनापुर – कोहळीटोला मार्गावर ( 20 रोजी ) सकाळी सात वाजता अवैधरित्या रेती तस्करी करणाऱ्या दोन ट्रॅक्टर वनकर्मचाऱ्यांनी पकडले. सहवनक्षेत्र कार्यालय दोडके /जांभळी अंतर्गत जमनापुर गावाजवळ 2 ट्रॅक्टर क्रमांक – MH 35 275 , ट्रॉली नंबर MH 35 AG 7003 व MH 35 1693, ट्रॉली नंबर MH 35 6593 हे ट्रॅक्टर सकाळी सात वाजता अवैध रेती घेऊन जात असतांना वनकर्मचाऱ्यांनी रंगेहात पकडण्यात यश आले आहे .

सदर वाहन हे कोहळीटोला येथील 1)ज्ञानेश्वर खोटेले व 2) मुकेश अग्रवाल यांचा असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली, त्यात वाहन चालक व हमाल घटनास्थळी मिळून आले. त्यात 3) नरेश चवारे , 4) राजेश तुंबडाम, 5) राजू पंधरे , 6) पूरनलाल पधाले, 7) भूमेश्वर वाघाडे, 8) हेमराज वाघाडे , 9) रोहित मरस्कोल्हे, 10) शोभीलाल लतये , 11) छगन लतये , 12) श्रीकृष्ण भिलावे , 13) जितेंद्र साखरे , 14) भरत इडपाचे , 15) रमेश पांडाल यांचेवर वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक प्रदीप पाटील (रोहयो) वन्यजीव यांचे मार्गदर्शनात सडक अर्जुनी चे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील मडावी , जांभळीचे सहवनक्षेत्र अधिकारी युवराज ठवकर , वनरक्षक विनोद आडे, संजय चव्हाण, तरुण बेलकर ,वनमजूर गायकवाड हे करीत आहेत. ह्या कारवाईमुळे दोडके/ जांभळी परिसरातील अवैध रेती तस्करी करणाऱ्या लोकांचे धाबे दणाणले आहेत. या परिसरातून दिवसाढवळ्या रेती वाहतूक ट्रॅक्टर , टिप्पर च्या माध्यमातून करून देवरी, गोरेगाव, सडक अर्जुनी परिसरात रेती विक्री होत होती, ही वाहने कृषी अंतर्गत तर नाही ना या बाबद तपास सुरू आहे.
•वन परिच्छेत्र अधिकारी सडक अर्जुनी, सुनील मडावी.
आज सर्व आरोपींना न्यायालया समोर हजर करण्यात येणार आहे, त्यात वाहन मालक यांना देखील विचारणा केली जाईल, सदर वाहन कृषी आहेत की अन्य त्याचा तपास चालू आहे, ही कार्यवाई 20 रोजी करण्यात आली आहे.