पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षण मंजूर करण्याबाबत वंचित बहुजन आघाडी कळून मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन सादर.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,22 नोव्हेंबर 2021- सडक अर्जुनी तालुक्यातील वंचित बहुजन आघाडी चे कार्यकर्ते यांच्या कळून 22 नोव्हेंबर 2021 रोजी, पैगंबर मोहम्मद बिल आणि मुस्लिम आरक्षण मंजूर करण्याबाबत मा.मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आला. आंदोलन,धरणे, निदर्शन करून खालील मागण्यांची निवेदन त्वरित मंजूर करण्यात यावे या उद्देशाने निवेदन देण्यात आले.
निवेदन मधील मागण्या-
१) न्यायालयाने मान्यता दिलेल्या 5 टक्के मुस्लिम शैक्षणिक आरक्षण तात्काळ लागू करण्यात यावे.
२) धार्मिक भावना भटकावून समाजात तेढ निर्माण करणार्यांना कठोर शिक्षा देणारे पैगंबर मोहम्मद बिल वंचित बहुजन आघाडीने शासनाला शुपरूत केले आहे ते बिल येणाऱ्या अधिवेशनात मंजूर करून तात्काळ कायदा लागू करावा.
३) महाराष्ट्र वक्क बोर्डाच्या मिळक्तिमध्ये वाढ करून इमान व मुअज्जीन आणि खुदान हजरत यांना मासिक वेतन करण्यात यावे.
४) संत विचारांचा प्रचार प्रसार करण्यात ह.भ.प. कीर्तनकार याना शासनाकडून मासिक वेतन सुरू करण्यात यावे .
५) वक्क बोर्डाच्या जमीनीवर झालेले अवैध कब्जे हटवून त्या जागेच्या अल्पसंख्यानक समाजाच्या उन्नती साठी उपयोग करावा
६) सारथी-बार्टी-महाज्योती प्रमाणे मुस्लिम अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांनसाठी स्वतंत्र प्रशिक्षण संस्थेची स्थापना करावी.

वरील सर्वं मागण्या मंजूर करून अल्पसंख्याक व वंचित समाजाला न्याय देण्यात यावा अशा प्रकारच्या मागण्या धरणे आंदोलना मार्फत वंचित बहुजन आघाडी कळून करण्यात आल्या.
धरणे आंदोलन तालुका अध्यक्ष भारद्वाज शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला त्यात प्रामुख्याने तालुका महासचिव राजू मेश्राम , सचिव सुनील भीमटे, अनिल टेम्बुने,बाबुराव इलंकार, ओमप्रकाश डोंगरे उपाध्यक्ष पृथ्वीवर बांबोले,कोषाध्यक्ष फलिन्द्र रागडले ,महिला आघाडी अध्यक्ष देवांगना गेडाम,उपाध्यक्ष लता सुखदेव,सचिव प्रीती उके,मिनाक्षी बांबोले प्रसिद्धी प्रमुख अश्विन डोंगरे,व सदस्य विलास वाघमारे ,शुभांगी वैद्य ,मंगला कांबळे निशा मेश्राम, अरविंद सोनवणे , जिजाराम मेश्राम , तेजराम मोनेश्वर , गिरधारी डोंगरे , आस्तिक डोंगरे,फिरोज टेम्बुरने,संजय शहारे सशिकपूर खोब्रागडे पप्रवीण मेश्राम अशे अनेक कार्यकर्ते धरणे आंदोलनाला उपस्थित होते ।