सौदड गावात 17000 रू. ची घरफोडी.
1 min read
गोंदिया,सडक अर्जुनी,सौदड,19 नोव्हेंबर 2021-प्रकरण अश्या प्रकारे आहे की, दिनांक ०३/११/ २०२१ चे ११:०० वा ते दिनांक १८/११/२०२१ १०:०० वा. दरम्यान यातील
फिर्यादी निलेश मोहन कोहळे वय २३ वर्ष रा. सौदड (रेल्वेटोली) हे आपल्या परीवारासह नागपुर येथे बहीनीकडे गेले असता कोणीतरी अज्ञात चोराने,

सुना मौका पाहुन फिर्यादीचे मागील दरवाजाचे कडी काढून घराचे आत प्रवेश करून एक जुना लॅपटॉप एच.पी. कंपनीचा किंमती १५,००० रु
व आलमारी मध्ये ठेवलेले दोन जोड चांदीच्या पयजन किंमती २,०००/रु असा एकुण १७,०००/रु वा माल चोरून नेल्याने फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून पोस्टे इग्गीपार येथे अप क्र. २९३/२०२९ कलम ४५४,४५७.३८० भादवी अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर
गुन्हयाचा तपास पोहचा / १०३४ चौधरी पोस्टे डुग्गीपार हे करीत आहेत.
