लोहारा येथे आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उदघाटन आमदार कोरोटे यांच्या हस्ते संपन्न.
1 min read
आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते केंद्राचे शुभारंभ.
गोंदिया,देवरी,19 नोव्हेंबर 2021 : देवरी तालुक्यातील लोहारा येथे शनिवार(ता.१३ नोव्हेम्बर) रोजी आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था लोहारा येथील आधारभूत धान खरेदी केंद्राचे उदघाटन या क्षेत्राचे आमदार सहषराम कोरोटे यांच्या हस्ते आणि आदिवासी विकास महामंडळाचे संचालक भरतसिंग दुधनांग यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्रादेशिक व्यवस्थापक आशिष मुळेवार, आदिवासी सहकारी संस्था लोहाराचे अध्यक्ष राजेश राऊत, उपाध्यक्ष कृपासागर गोपाले, सरपंच पन्नालाल चौधरी व संस्थेचे सचिव रविंद्र नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
या प्रसंगी संस्थेचे संचालक व्यंकट भोयर, माणिक राऊत, तुकाराम धुर्वे, भोजराज उईके, कुवरलाल नाईक, धनलाल चुटे, दिलीप कांबळे, बुधराम डुंभरे, केशव कांबळे, सेवताबाई चनाप, कुंताबाई राऊत, यांच्या सह लोहारा परिसरातील शेतकरी, संस्थे संचालक, सभासद बहुसंसख्येने उपस्थित होते.

लोहारा येथे आधारभूत धान खरेदीचे उपकेंद्र सुरू करून या केंद्राद्वारे परिसरातील शेतकऱ्यांचे धान खरेदी केली जाणार आहे. खरिप हंगामातील ३० हजार क्विंटल धान खरेदी केली जाणार असल्याने लोहारा परिसरातील शेतकऱ्यांनी आपले धान या आधारभूत धान खरेदी केंद्रावर द्यावे असे आवाहन यावेळी आमदार सहषराम कोरोटे यांनी केले.
खरीप हंगाम २०२१-२२ मधील धानखरेदी केंद्र त्वरित सुरू करून शेतकऱ्यांची अडचण दूर व्हावे आणि खरीप धानाची विक्री व्यापाऱ्यांना कमी भावात विकावा लागू नये या करीता आमदार सहषराम कोरोटे यांनीं हा खरेदी केंद्र सुरू करण्यास प्रयत्न केला.
या उदघाटन सोहळ्याचे प्रास्ताविक सचिव रविंद्र नाईक यांनी तर संचालन राकेश सोनवणे यांनी आणि उपस्थितांचे आभार उपाध्यक्ष कृपासगर गोपाले यांनी मानले.