महामानव या महाकाव्य ग्रंथामध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील कवी अश्लेष माडे यांच्या कवितेचा समावेश
1 min read
•2021 कविता असलेल्या महामानव या महाकाव्य ग्रंथामध्ये कवी अश्लेष माडे यांच्या कवितेचा समावेश.
•जिल्ह्यातील 19 कविंचा सहभाग.

गोंदिया,सडक/अर्जुनी,15 नोव्हेंबर 2021-
भारताचे संविधानाचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर हे शोषित,वंचित, उपेक्षित ,दीन दलित पीडितांचे प्रेरणास्थान असून या महामानवाला 2021 या वर्षात एकूण 2021 कवितांचा संग्रह समर्पित करून राज्यातील 2021 कवींनी आपली कृतज्ञता व्यक्त केली आहे.गोंदिया येथील जिल्हाधिकारी नयना गुंडे यांच्या हस्ते या महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले आहे .
नांदेड येथील सुप्रसिद्ध कवी प्राध्यापक अशोककुमार दवणे यांनी या महाकाव्यग्रंथाचे संपादन केले आहे. राज्यातील 36 जिल्ह्यात एकाच वेळी प्रकाशित करून एक जागतिक विक्रम स्थापन केला आहे .
” महामानव ” या महाकाव्यग्रंथात गोंदिया जिल्ह्यातील कोहमारा येथील कवी, पत्रकार अश्लेष माडे यांच्यासह 19 कवींच्या कविता समाविष्ट आहेत.
गोंदिया येथे जिल्हाधिकारी कार्यालयात या महाकाव्य ग्रंथ प्रकाशन प्रसंगी जिल्हाधिकारी नयना गुंडे, अप्पर जिल्हाधिकारी राजेश खवले,कवी एस. जी. वाघमारे आदी उपस्थित होते.यावेळी मा. जिल्हाधिकारी यांना महामानव हे महाकाव्य ग्रंथ भेट देण्यात आले.
माननीय जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या महाकाव्यग्रंथाचे खूप कौतुक केले व सर्व कवींना शुभेच्छा दिल्या.महामानव या महाकाव्य ग्रंथाची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्य निश्चित नोंद घेतली जाईल ,असा आशावाद व्यक्त केला आहे.
